१२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रुपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:26+5:302021-07-15T04:10:26+5:30

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम -- या माध्यमातून मागील दोन वर्षांतील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ ...

Distribution of scholarships worth Rs. 8 lakh 33 thousand to 129 students | १२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रुपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप

१२९ विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजार रुपयांंच्या शिष्यवृत्तीचे वाटप

Next

खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम

--

या माध्यमातून मागील दोन वर्षांतील १२९ गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ८ लाख ३३ हजारांहून अधिक रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, संचालक कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, लालचंद कर्नावट, ॲड. माणिक पाटोळे, सुभाष टाकळकर, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य एस. एन. टाकळकर, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. या शिष्यवृत्तीसाठी गुणवंत परंतु आई-वडील नसलेले, मागास प्रवर्गातील, आदिवासी, अंध-अपंग, आर्थिक दुर्बल तसेच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अंतर्गत ४६ विद्यार्थिनींना सुमारे २ लाख ९२ हजार रु., शारदाबाई पवार शिष्यवृत्ती अंतर्गत ४५ विद्यार्थिनींना सुमारे ३ लाख १८ हजार, साहेबरावजी बुट्टे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना ९२ हजार तसेच दत्तात्रेय वळसे पाटील शिष्यवृत्ती अंतर्गत १९ विद्यार्थ्यांना सुमारे १ लाख ३० हजार असे एकूण ८ लाख ३३ हजार रूपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत ८ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश सुपूर्द करण्यात आला.

नुकतेच सी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सागर पिंगळे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या पदवी परीक्षेत अकौन्टसी विषयात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थिनी आकांक्षा वाडेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी ॲड. माणिक पाटोळे, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, धर्मराज पवळे, सी.ए. सागर पिंगळे, आकांक्षा वाडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी केले, तर आभार प्रा. एस. एन. टाकळकर यांनी मानले.

फोटो ओळ: शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील व पदाधिकारी.

--

कोट

खेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये या भूमिकेतून आणि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचे भविष्य बदलू शकते, या भावनेतून संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांची निवड पारदर्शकपणे केली आहे. या शिष्यवृत्तीचा उपयोग विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कारणासाठी करावा.

ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील

Web Title: Distribution of scholarships worth Rs. 8 lakh 33 thousand to 129 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.