सेतू अभ्यास पुस्तके वाटप घोटवडेत सेतू अभ्यास पुस्तके वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:16+5:302021-07-11T04:09:16+5:30
कोरोना प्रादुर्भाव काळात गेली दीड वर्ष शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. सेतू पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यासात ...
कोरोना प्रादुर्भाव काळात गेली दीड वर्ष शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. सेतू पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यासात मदत होणार असून, सदर अभ्यास करून सर्व विषयाच्या नोट्स वहीत लिहिले जाईल व शिक्षक स्वतः विध्यार्थ्यांच्या घरी जाऊन सदर नोट्स तपासतील. त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना लाभ होईल. सदर प्रसंगी प. स. केंद्रप्रमुख एस. एम. साबळे, डॉ. विजय पवार व ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके यांनी सदर विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सरपंच स्वाती भेगडे, उपसरपंच भीमाजी केसवड, ग्रामपंचायत सदस्य राजाराम शेळके, संतोष गोडाबे, हनुमंत घोगरे, नवनाथ भेगडे, संभाजी गोडाबे, सारिका खाणेकर, निकिता घोगरे, सोनाली मातेरे, मंगल गोडाबे, भाग्यश्री देवकर, वैशाली कुंभार व पोलीस पाटील दीपक मातेरे, लक्ष्मण कानगुडे, उत्तम गोडाबे, ग्रामस्थ हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन आवळे पुष्पा भोपे यांनी केले.