बारामतीत शीरखुर्मा साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:11 AM2021-05-13T04:11:17+5:302021-05-13T04:11:17+5:30
बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक व बांधकाम समितीचे ...
बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी नगरसेवक व बांधकाम समितीचे सभापती सत्यव्रत काळे, मंडळाचे माजी सभापती आजी कमरूद्दिन सय्यद, सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद, वसीम कुरेशी, सुभान कुरेशी, आकलाज सय्यद, राजू शेख, आसिफ झारी, सलीम तांबोळी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमासाठी बारामती दूध संघाच्या वतीने बाराशे लिटर दूध व दौंड शुगर कारखान्याच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला दोन किलो याप्रमाणे ६०० किलो साखर देण्यात आली. तसेच सर्व मुस्लिम समाजबांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन करताना अल्ताफ सय्यद यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व हे पंधरावे वर्ष असल्याचे नमूद केले .
ज्येष्ठ नगरसेवक गुजर यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना बारामती शहरात कडकडीत बंद असताना लॉकडाऊनच्या काळात या साहित्याचे वाटप केल्याने सर्व बांधवांना ईद आनंदात साजरी करू शकतील. एखादा उपक्रम सतत १५ वर्षे सातत्याने सुरू ठेवणे ही बाब कौतुकास पात्र आहे. या व्यतिरिक्त सय्यद यांनी बारामती शहरांमध्ये अनेक सामाजिक विधायक काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी देखील अल्ताफ सय्यद यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केल्याचे गुजर यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे आभार सुभान कुरेशी यांनी मानले.
बारामतीत रमजान ईदनिमित्त अल्ताफ सय्यद, तरन्नुम सय्यद यांच्या वतीने शीरखुर्मा साहित्याचे वाटप करण्यात आले.
१२०५२०२१बारामती—०४