बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्टीमरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:42+5:302021-05-28T04:08:42+5:30
रोज एक वाफ अभियानांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये गरजूंना वाफ घेण्यासाठी स्टीमर वाटप करण्यात आले. ज्या भागात स्टीमर वाटले त्या ...
रोज एक वाफ अभियानांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये गरजूंना वाफ घेण्यासाठी स्टीमर वाटप करण्यात आले. ज्या भागात स्टीमर वाटले त्या भागात नागरिकांना स्टीमरविषयी माहिती रितेश सोनवणे यांनी दिली. भीमनगर, गांधी चौक, सिद्धार्थनगर, होलारनगर, बांगला साईड, शालीमार चौक, जगदाळेवस्ती इत्यादी भागांत वाफ घेण्यासाठी गरजूंना स्टीमर वाटण्यात आले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात गरजूंना स्टीमरचे वाटप करून वंचित बहुजन आघाडी आणि भीमक्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली ही वाखण्याजोगी बाब आहे.
प्रस्तावना आश्विन वाघमारे यांनी केली तर, सूत्रसंचालन उमेश नडगमकर यांनी केले.
याप्रसंगी ॲड. किरण लोंढे, अभिषेक जाधव, कुमार पिल्ले उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंटी वाघमारे, अजिंक्य गायकवाड, राहुल नायडू, अक्षय शिखरे, किसन बनसोडे, शिवा खरारे, राजेश ओहळ, सूरज जगताप, सुमित सोनवणे, आशुतोष वाघमारे यांचे सहकार्य मिळाले.
२७ दौंड
दौंड येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त स्टीमर वाटप करतांना पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि इतर.
===Photopath===
270521\27pun_10_27052021_6.jpg
===Caption===
२७ दौंडदौंड येथै बुद्ध जयंती निमीत्ताने स्टीमर वाटप करतांना पोलीस निरिक्षक नारायण पवार आणि इतर.