आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:35+5:302021-07-04T04:07:35+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेण्यास अडचण येत आहे. त्यातच आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षणाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना पाचवीच्या वर्गात ...

Distribution of textbooks to tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप

googlenewsNext

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयात ऑनलाईन प्रवेश घेण्यास अडचण येत आहे. त्यातच आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षणाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना पाचवीच्या वर्गात नाव नोंदविताना समस्येला सामोरे जावे लागत होते. परिणामी विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन विद्यालयाने पुढाकार घेत थेट ठाकरवाडीसारख्या डोंगराळ भागातील आदिवासी कुटुंबांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले.

विद्यार्थ्यांच्या प्रवेश उपक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य आर. डी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक एन. व्ही. बहिरम व एस. के. जोंधळे यांनी केले. तर पाठ्यपुस्तक घरपोच वाटपाचे नियोजन ग्रंथपाल एम.टी. दोंड यांनी केले.

फोटो ओळ : पाचवीच्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन शालेय पुस्तके सुपूर्द करताना शिक्षकवर्ग.

Web Title: Distribution of textbooks to tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.