आळंदीत वारकरी साधकांना तीन महिन्यांचा किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:47+5:302021-09-04T04:14:47+5:30
या पार्श्वभूमीवर कडाचीवाडी (ता. खेड) येथील उद्योजक दत्तात्रय खांडेभराड यांनी मुलीचा वाढदिवस डामडौलात साजरा न करता वाचविलेल्या सर्व पैशातून ...
या पार्श्वभूमीवर कडाचीवाडी (ता. खेड) येथील उद्योजक दत्तात्रय खांडेभराड यांनी मुलीचा वाढदिवस डामडौलात साजरा न करता वाचविलेल्या सर्व पैशातून आळंदीतील श्री. रामधाम मधुकरी आश्रम व वारकरी शिक्षण संस्थेतील वारकरी साधकांना किमान पुढील तीन महिने पुरेल इतका अत्यावश्यक किराणा माल वितरित केला.
संजीवनी युवा मंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी साधकांसह स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले असून खांडेभराड यांच्या उपक्रमाचे इतरांनी अनुकरण करण्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी अध्यक्ष दत्ताशेठ खांडेभराड, कृष्णांगी दत्तात्रय खांडेभराड, अॅड. घोलप सर, ॲड. किरण झिंजूरके, विशाल कड, किरण कड, सुनिल कड व वारकरी विद्यार्थी उपस्थित होते.
०३ शेलपिंपळगाव
आळंदीतील वारकरी साधकांना किरणा मालाचे वाटप करताना दत्तात्रय खांडेभराड व अन्य कार्यकर्ते.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)