विद्यार्थ्यांना सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमार्फत खेळण्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:20+5:302021-06-05T04:08:20+5:30
कोविड कालावधीतही विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑनलाईन अभ्यासासाठी प्रेरणा म्हणून पाटेठाण कारखाना येथील ऊसतोडणी कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना देखील खेळण्यांचे वाटप करण्यात ...
कोविड कालावधीतही विद्यार्थ्यांनी केलेल्या ऑनलाईन अभ्यासासाठी प्रेरणा म्हणून पाटेठाण कारखाना येथील ऊसतोडणी कामगारांच्या शाळाबाह्य मुलांना देखील खेळण्यांचे वाटप करण्यात आले. वडगाव बांडे केंद्रातील पंधरा शाळांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी गोष्टींच्या पुस्तकांचे तसेच वडगाव बांडे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दप्तर तसेच वडगाव बंडे केंद्रातील अंगणवाड्या,राहू केंद्रातील काही अंगणवाड्या यांच्यासाठी देखील दप्तरवाटप करण्यात आले.
दौंड तालुक्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण विभागांतर्गत संस्था मदत करत असून, यासाठी वडगाव बांडे येथील शिक्षिका सुनीता विजय काटम यांचे योगदान लाभले आहे. राज्य समन्वयक हरीश वैद्य यांचे सहकार्य तर संस्थेच्या प्रमुख इपशीता दास यांच्या मार्गदर्शनाखाली काम दौंड तालुक्यात करण्यात येत आहे.
वडगाव बांडे (ता. दौंड) येथील शाळेतील विद्यार्थ्यांना सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमार्फत परकीय देशातील खेळण्यांचे वाटप करण्यात आले.