पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:37+5:302021-06-05T04:09:37+5:30
पुणे : रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कलावंतांतर्फे पुण्यातील विविध नाट्यगृहांमधील पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञांना ...
पुणे : रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कलावंतांतर्फे पुण्यातील विविध नाट्यगृहांमधील पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञांना आज जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे कलाकार-तंत्रज्ञांची रोजच्या जगण्यासाठी होणारी धडपड-समस्या जाणून घेऊन रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि भरत नाट्य संशोधन मंदिरातील कलावंतांनी जवळपास ४० तंत्रज्ञ-कलाकारांना मदतीचा हात दिला आहे.
जीवनावश्यक साहित्याचे वाटप रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या भावी प्रांतपाल मंजू फडके, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसे, विश्वस्त पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे, संजय डोळे, रोटरीच्या खजिनदार आदिती रहाणे, कार्यवाह चंद्रशेखर महामुनी, ज्येष्ठ कलावंत शरद गोखले यांच्या पत्नी नंदाताई गोखले, सुप्रिया गोसावी, जयसिंघानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच एमएएसटी-पीडीसी टिम मॅस्टेक आणि मित्र परिवारातर्फे अविनाश ओगले आणि उदय पाळंदे यांनी कलाकार-तंत्रज्ञांना आर्थिक सहाय्य केले.