जिल्ह्यात ९१ टक्के नागरिकांना कोविशिल्ड, ९ टक्के नागरिकांना कोव्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:08 AM2021-06-23T04:08:03+5:302021-06-23T04:08:03+5:30

पुणे : सध्या जिल्ह्यात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात ...

In the district, 91% of the citizens have been vaccinated and 9% have been vaccinated | जिल्ह्यात ९१ टक्के नागरिकांना कोविशिल्ड, ९ टक्के नागरिकांना कोव्हॅक्सिन

जिल्ह्यात ९१ टक्के नागरिकांना कोविशिल्ड, ९ टक्के नागरिकांना कोव्हॅक्सिन

Next

पुणे : सध्या जिल्ह्यात सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटची उत्पादनक्षमता जास्त असल्याने कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोव्हिशिल्ड लसीचे जास्त डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात आतापर्यंत ९१ टक्के नागरिकांना कोविशिल्ड, तर ९ टक्के नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले आहेत. मानवी चाचण्यांमध्ये दोन्ही लसींची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिध्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लसीकरण आवर्जून करून घ्यावे, असे आवाहन वैैद्यकतज्ज्ञांकडून केले जात आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटांचा सामना करताना आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला. पहिल्या लाटेच्या वेळी कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपल्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. सामान्य नागरिकांना १ मार्चपासून लस उपलब्ध झाली. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी परिणामकारक ठरत आहेत. मानवी चाचण्यांमध्ये दोन्ही लसींची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिध्द झाली आहे. कोविशिल्ड डोसचा पुरवठा जास्त प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यात या लसींच्या लसीकरणाचे प्रमाण जास्त आहे. १७ जूनच्या अहवालानुसार, पुणे जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्ड लसीचे २५,५१,४८० डोस तर कोव्हॅक्सिन लसीचे ३,४३,०६० डोस प्राप्त झाले आहेत.

कोविशिल्ड लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे, तर कोव्हॅक्सिन लस अद्याप मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शिक्षण, नोकरी अथवा इतर कोणत्याही कारणास्तव परदेशात जाणाऱ्या नागरिकांकडून कोविशिल्ड लसीला पसंती दिली जात आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे इतके आहे. कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवडे इतके आहे. मानवी चाचण्यांमध्ये कोविशिल्डची परिणामकारकता ७०-७५ टक्के, तर कोव्हॅक्सिनची परिणामकारकता ७८ टक्के असल्याचे सिध्द झाले आहे.

---------------------------

एकूण लसीकरण - ३८,०५,६०१

कोविशिल्ड - ३४,४८,२६६

कोव्हॅक्सिन - ३,५७,३३५

-------------------------

२) वयोगटानुसार लसीकरण (ग्राफ)

कोविशिल्ड कोव्हॅक्सिन

पहिला डोस दुसरा डोस पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी १४४२४३ ९४७७४ ९८५७ ७५१४

फ्रंट लाईन २२३६४९ ८८५५८ १५९२८ १२६४९

१८ ते ४४ ८१२२७६ ३ ४०८६५ २४४७४

४५ ते ५९ ९६३७०२ ९३१७२ ५६७८२ ४०३०८

६० वर्षांवरील ७६०३७१ २६७५१८ ८३७६९ ६५१८९

Web Title: In the district, 91% of the citizens have been vaccinated and 9% have been vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.