जिल्हा कृषी औद्योगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:13 AM2021-02-26T04:13:26+5:302021-02-26T04:13:26+5:30

सोमेश्वरनगर : पुणे जिल्हा कृषी औद्योगिक ही संस्था पूर्ण कर्जमुक्त आहे. स्वभांडवली करत हुकमी उत्पन्नांचा स्रोत उभा करत ...

District Agro-Industrial | जिल्हा कृषी औद्योगिक

जिल्हा कृषी औद्योगिक

Next

सोमेश्वरनगर : पुणे जिल्हा कृषी औद्योगिक ही संस्था पूर्ण कर्जमुक्त आहे. स्वभांडवली करत हुकमी उत्पन्नांचा स्रोत उभा करत संस्था भक्कम केली आहे, असे प्रतिपादन सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी व्यक्त केले.

नीरा (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षस्थानी शहाजी काकडे होते. त्या वेळी ते बोलत हाेते. याप्रसंगी राजेंद्र काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक मानसिंग जगताप, दिग्विजय जगताप, विजयदेवी निंबाळकर, गौरव काकडे, विजय काकडे, डॉ. नारायण रणवरे, अ‍ॅड. तानाजी गायकवाड, बबन मासाळ, विजयसिंह नलवडे, मोहन खोमणे, हरिश्चंद्र पिंगळे, अरुण भागवत, ताराबाई जगताप, श्रीरंग धुमाळ यांच्यासह सभासद उपस्थित होते.

काकडे पुढे म्हणाले, संस्था स्वभांडवली करतच इफ्को, कृभको अशा विविध संस्थांची मदत घेत आहोत. काही काळ संस्था अडचणीत गेली होती. मात्र पुन्हा कधीही अडचणीत जाणार नाही, असे नियोजन केल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात भाऊसाहेब सपकळ, सतीश जगताप, गुलाबराव गायकवाड, बापूराव येडे, शिवाजी पिंगळे, शिवाजी नवले, सुनीता अरुण काकडे आदी सभासदांचा विशेष योगदान दिल्याबद्दल सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याचा तसेच इमारत निधीसाठी वीस टक्के नफा राखून ठेवणे आणि अडीच टक्के चढउतार निधी राखून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

मागील वर्षात १४ ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे सणसर खत डेपोमध्ये पाणी शिरून झालेले नुकसान, मयत व्यक्तींची येणे बाकी अशा बाबीमधील १२ लाख २५ हजार इतकी रक्कम गंगाजळीमधून निर्लेखित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक जगन्नाथ पिंगळे यांनी अहवालवाचन केले. आभार उपाध्यक्ष मानसिंग जगताप यांनी मानले.

Web Title: District Agro-Industrial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.