जिल्हा बँकेच्या पीककर्ज दरात वाढ, चौदा पिकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:13 AM2018-05-10T02:13:57+5:302018-05-10T02:13:57+5:30
शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ केली आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.
कळस - शेतकरी घेत असलेल्या पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही पीककर्ज दरात वाढ केली आहे. यंदा बँकेने चौदा पिकांच्या पीक कर्जदरात वाढ केली आहे. यामध्ये उसाच्या पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा पिकांच्या पीककर्ज दरात सर्वाधिक म्हणजे वीस हजार रुपयांनी वाढ केली आहे.
उसापाठोपाठ डाळिंबाच्या सुधारित जातीच्या पीककर्जाच्या दरात पंधरा हजार रुपयाने वाढ केली आहे. यामुळे विकास सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
दरवर्षी शेतकरी घेत असलेल्या पिकांच्या वार्षिक उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने उत्पादन खर्चाचे निश्चित केलेले दर यावर प्रगतशील शेतकरी, तसेच जिल्हा उपनिंबधक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये उत्पादन खर्चावर चर्चा झाली . त्यामध्ये पंधरा पिकांच्या पीककर्ज दरात वाढ करण्याचे निश्चित केले आर्थिक वर्षामध्ये ठरविलेल्या दरानुसार शेतकºयांना कर्जाचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील जवळपास २७५ शाखांमधून कर्ज वाटप केले होते. जिल्ह्यात बँकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास दोन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात.
शेतकºयांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले
जाणार आहे. तर तीन लाखांच्या
पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज
दिले जाते. मात्र, यंदा शेती कर्जातील भूईमूग, खरीप कांदा, पूर्व हंगामी
ऊस, सुरू ऊस, खोडवा ऊस,
द्राक्षे, टिश्युकल्चर केळी, बटाटा खरीप, टोमॅटो, संकरित भात,
कांदा रब्बी, बटाटा रब्बी, डाळीब सुधारित जाती अशा पंधरा पिकांच्या पीक कर्ज दरात वाढ केली आहे. इतर कोणत्याही पिकांच्या कर्जदरात वाढ केलेली नाही.