जिल्हा बँका सुटीच्या दिवशी सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:24+5:302021-03-14T04:11:24+5:30
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा वीजबिले, कर्जवसुली, ठेवी संकलन इत्यादी जमा-खर्च करण्यासाठी मार्च महिन्यातील सार्वजनिक ...
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा वीजबिले, कर्जवसुली, ठेवी संकलन इत्यादी जमा-खर्च करण्यासाठी मार्च महिन्यातील सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी सुरू ठेवण्यात येत असल्याचे विभागीय अधिकारी आनंद थोरात यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीजबिले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घेण्यात येत असतात. वीज कंपनीने जिल्हा बँकेला सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा चालू ठेवण्याची सूचना केल्याने जिल्हा बँकेच्या सर्व शाखा मार्च महिन्यात सर्व सार्वजनिक सुटीचे दिवस १३, १४, २१, २७, २८ व २९ मार्च २०२१ या सुटीच्या दिवशी चालू राहणार आहेत. यादिवशी वीजबिले, कर्जवसुली, ठेवी संकलन इत्यादी जमाखर्च सुरु ठेवण्यात आला आहे मात्र सदर दिवशी आरटीजीएस एनईएफटी व क्लिअरिंग व्यवहार बंद राहील असे विभागीय अधिकारी आनंद थोरात यांनी सांगितले. यावेळी कोरेगाव भिमा शाखेत आज वीज बिल भरणा चालू ठेवण्यात आला होता.शिरूर विभागातील सर्व शाखा सुरू आहेत
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुटीच्या दिवशी वीज बिल भरणा चालू असताना