झगडेवाडीतील विकास कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:24+5:302021-01-03T04:13:24+5:30
यावेळी, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ...
यावेळी, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आदी उपस्थित होते.
झगडेवाडी गावाच्या विकास कामांची पाहणी करताना, अधिकाऱ्यांनी गावातील झालेल्या विकासकामांची पाहणी करून चांगल्या पद्धतींच्या सुविधा गावांमध्ये निर्माण होत आहेत यांचे कौतुक केले. असे ग्रामीण भागात उत्तम विकासकामे करणाऱ्या गावांचा शासकीय स्तरावर येणाऱ्या काळात मोठा सन्मान केला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी झगडेवाडी गावच्या सरपंच रुपाली अतुल झगडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर बोराटे, डॉ. दादाराम झगडे, संतोष राजगुरू, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण झगडे, ग्रामसेवक आबासाहेब जगताप, उत्तम झगडे, गणेश झगडे, हिरामण झगडे आदी उपस्थित होते.
गावचा चेहरा-मोहरा बदलणार
शासनाच्या मदतीने गावाचा सर्वांगीण विकास करणार
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी गाव छोटे आहे. तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने शिक्षित व साक्षर आहेत. त्यामुळे गावाचा विकास गाडा चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. येणाऱ्या काळात शासनाच्या मदतीने झगडेवाडी गावाचा चेहरा मोहरा बदलून, सर्वांगीण विकास करणार आहे. अशी ग्वाही झगडेवाडी गावच्या सरपंच रुपाली अतुल झगडे यांनी दिली.
०२ इंदापूर
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथील विकास कामांची पाहणी करताना जिल्हाधिकारी.