पुणे | पालखी मार्ग, पालखी तळ सोहळ्यासाठी सज्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 08:03 PM2022-05-04T20:03:34+5:302022-05-04T20:05:28+5:30

सध्या जिल्ह्यात पालखी मार्गांची व नवीन पालखी तळांची कामे सुरू आहेत...

district collectors order to prepare for palkhi marg and palkhi tal ceremony ashadhi vaari | पुणे | पालखी मार्ग, पालखी तळ सोहळ्यासाठी सज्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे | पालखी मार्ग, पालखी तळ सोहळ्यासाठी सज्ज करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

googlenewsNext

पुणे : कोरोना संकटामुळे दोन वर्षांच्या प्रतिक्षेतनंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळा निघणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पालखी मार्ग व विविध पालखी तळांची प्रशासनाच्या वतीने पाहणी करण्यात आली. यादरम्यान आढळून आलेल्या त्रुटींवर त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यंत्रणेला दिले आहेत. सध्या जिल्ह्यात पालखी मार्गांची व नवीन पालखी तळांची कामे सुरू आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे पालखी सोहळ्याबाबत आयोजित प्राथमिक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते. तर संबंधित तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतेबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे. स्वच्छतेची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. पालखी महामार्गाची कामे सुरू असल्याने वाटेत अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. संबंधित विभागांकडून आवश्यक कामे तातडीने करून घ्यावीत.

सासवड पालखी मुक्कामाच्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. पुढील १० दिवसात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. गेल्या दोन वर्षात कोविडमुळे पालखी सोहळा न झाल्याने यावर्षी अधिक संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुविधांचे नियेाजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Web Title: district collectors order to prepare for palkhi marg and palkhi tal ceremony ashadhi vaari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.