जिल्ह्याला गुरुवारी मिळाले नाही एकही रेमडेसिविरचे इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:29+5:302021-04-30T04:15:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी मागणी असतानाही गुरुवारी एकही इंजेक्शन प्राप्त झाले नाही. यामुळे हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी मागणी असतानाही गुरुवारी एकही इंजेक्शन प्राप्त झाले नाही. यामुळे हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ झाली. असे असतानाच हैदराबाद येथील एका कंपनीकडून पुरवण्यात आलेले इंजेक्शनचे वितरण तांत्रिक कारण देत थांबविण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास १९०० इंजेक्शनचे वितरण थांबविण्याचे आदेश दिले आहे.
कोरोनाबाधितांवर रेमडेसिविर इंजेक्शन गुणकारी असल्याने त्यांची मोठी मागणी आहे. यामुळे या इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मागणी असूनही गुरुवारी मात्र एकाही इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्याला झाला नाही. यामुळे हे इंजेक्शन मिळवण्याची नातेवाईकांची धावपळ ही गुरुवारीही पाहायला मिळाली. या इंजेक्शनचा पुरवठा हा समन्यायी तत्त्वावर वितरित केला जातो. गुरुवारी सायंकाळपर्यंत नव्याने साठा आलाच नाही. मात्र गेल्या दोन दिवसात हजार इंजेक्शन रुग्णालयांना पुरवण्यात आली आहेत. हैदराबाद स्थित एका ौषध निर्माण कंपनीने रेमडेसिविरचे १९०० इंजेक्शन बुधवारी पुरवले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षातून त्याचे वितरण करण्यात आले. परंतु या कंपनीने तांत्रिक कारणामुळे या इंजेक्शनचे वितरण करू नये, असे पत्र अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीही या कंपनीचे इंजेक्शनचे वितरण तत्काळ थांबवले.