जिल्हास्तरीय बॅडमिंटन : आदिती, तारा, केदार यांना तिहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 04:37 AM2017-12-31T04:37:07+5:302017-12-31T04:37:25+5:30

तारा शहा, आदिती काळे, केदार भिडे यांनी आपापल्या वयोगटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आयोजित अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुट मिळविला.

 District level Badminton: Triple crown for Aditi, Tara, Kedar | जिल्हास्तरीय बॅडमिंटन : आदिती, तारा, केदार यांना तिहेरी मुकुट

जिल्हास्तरीय बॅडमिंटन : आदिती, तारा, केदार यांना तिहेरी मुकुट

Next

पुणे : तारा शहा, आदिती काळे, केदार भिडे यांनी आपापल्या वयोगटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून हवेली तालुका बॅडमिंटन संघटना आयोजित अमनोरा करंडक बॅडमिंटन स्पर्धेत तिहेरी मुकुट मिळविला.
पीवायसी जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत या स्पर्धेत तारा शहाने १५, १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद जिंकले. तारा शहा निखील कानेटकर बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीमध्ये सराव करीत असून विद्या व्हॅली स्कूलमध्ये सातवीत शिकत आहे. तिने पहिल्यांदाच तिहेरी मुकुट मिळवला. दुसरीकडे आदिती काळेने महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत जेतेपद आपल्या नावावर केले. याचबरोबर केदार भिडेने १७ वर्षांखालील एकेरी व दुहेरीत व १९ वर्षांखालील दुहेरीतील विजेतेपद आपल्या नावावर केले.स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाट्य-सिनेअभिनेते प्रशांत दामले, पीवायसीचे अध्यक्ष विजय भावे, अमनोराचे संचालक आदित्य देशपांडे यांच्या हस्ते पार पडला.

तारा शहाला वार्षिक शिष्यवृत्ती
या वेळी संघटनेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारी ५० हजार रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती तारा शहाला अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते देण्यात आली.
या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचा मान मुलांमध्ये केदार भिडेला वर मुलींमध्ये आदिती काळेला देण्यात आला.

निकाल सर्व अंतिम

मुले : १७ वर्षांखालील : एकेरी : केदार भिडे, वि. वि. प्रतीक धर्माधिकारी २१-१७, २१-१४; दुहेरी : केदार भिडे/ पार्थ सुधांशु वि. वि. सस्मित पाटील/ व्यंकटेश अगरवाल २१-११, २१-१५.
१९ वर्षांखालील दुहेरी : केदार भिडे/ पार्थ घुबे वि. वि. आर्य देवधर/ सोहम नावंदर २१-१९, २१-१८, मुली : १९ वर्षांखालील : एकेरी : तारा शहा वि. वि. जान्हवी कानेटकर २१-१७, १०-२१, २१-१४; १७ वर्षांखालील : तारा शहा वि. वि. जान्हवी कानेटकर २१-१९, २२-२०; १५ वर्षांखालील : तारा शहा वि. वि. रिया हब्बू २१-१२,२१-१७; महिला : दुहेरी : आदिती काळे /रिया जाईल वि. वि. दीप्ती सरदेसाई/ नूपुर गाडगीळ २१-१०, २१-१३; मिश्र दुहेरी : ऋतुराज देशपांडे/आदिती काळे वि. वि. चैतन्य सालपे/ मानसी गाडगीळ १५-२१, २१-११, २१-१०; महिला : एकेरी : आदिती काळे वि. वि. चारुता वैद्य ९-२१, २१-१८,२१-१२.
 

Web Title:  District level Badminton: Triple crown for Aditi, Tara, Kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा