दिव्यांगांसाठी अखेर जिल्हास्तरीय समिती गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:04+5:302021-08-20T04:14:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांसाठीची जिल्हास्तरीय समिती अखेर स्थापन केली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांसाठीची जिल्हास्तरीय समिती अखेर स्थापन केली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली ही समिती आल्याने दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री अजित पवार, सचिव म्हणून जिल्हाधिकारी राजेश देशमुख काम पाहणार आहेत.
राज्याचे अपंग आयुक्त कार्यालय पुण्यात आहे. गुरुवारी (१९ ऑगस्ट) यास २१ वर्षे पूर्ण होत आहेत. २१ वर्षांत २१ आयुक्तांनी या पदाचा कार्यभार पाहिला. परंतु, आजही आयुक्त कार्यालयाकडे दिव्यांगांची नोंद नाही.
समितीतील सदस्या सुरेखा ढवळे यांनी सांगितले की, ज्या नगरपालिका, ग्रामपंचायती निधी खर्च करणार नाहीत. त्यांच्याकडे जातीने लक्ष देऊन त्यांना हा निधी खर्च करण्यास भाग पाडण्यासाठी समितीचा फायदा होईल. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
चौकट
...अशी असेल समिती
* अध्यक्ष :- पालकमंत्री अजित पवार.
* सचिव सदस्य :- जिल्हाधिकारी राजेश देशमुख.
* सदस्य :- पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी.
* दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते सदस्यपदी :- पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील सुरेखा ढवळे, दौंड तालुक्यातील भीमनगर येथील मिलिंद साळवी, मुळशी तालुक्यातील डोंगरगावचे गणेश जोशी, येरवडा येथील राजेंद्र काटे, निगडी यमुनानगरचे आकाश कुंभार आदी सदस्य म्हणून काम करणार आहेत.
* सदस्य (नगरपालिका प्रशासन) :- बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, सासवड, जेजुरी, भोर, इंदापूर, जुन्नर, शिरूर, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, वडगाव या सर्व नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.