शाळेकडे खंडणी मागितल्याप्रकरणी जिल्हासंघटकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:22+5:302020-12-17T04:38:22+5:30
अभय अरुण वाडेकर (रा. चाकण) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र इंद्रनील सिंग ( वय ५१, रा. इंद्रायणी ...
अभय अरुण वाडेकर (रा. चाकण) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र इंद्रनील सिंग ( वय ५१, रा. इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनसेचे जिल्हा संघटक अभय वाडेकर यांनी २७ नोव्हेंबरला प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मनसेच्या सात ते आठ कार्यकर्त्यांसह जाऊन लॉकडाऊन मध्ये शाळेने जास्त फी का आकारली यावरून धमकी दिली. व त्या प्रकरणी निवेदनही दिले. ५ डिसेंबरला अभय वाडेकर यांनी फिर्यादी महेंद्रसिंग यांना भोसरीतील नाना नानी पार्क येथे भेटून शाळेसमोर आंदोलन करून शाळेची बदनामी करण्याची धमकी दिली. शाळेचे बदनामी टाळायची असेल तर एक लाख रुपये खंडणी मागीतली. त्यानुसार ३० हजार रुपये मिळाल्यानंतर वाडेकर यांनी उर्वरित पैशासाठी सिंग यांना फोन केला. त्यानंतर सिंग यांनी चाकण पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार पोलिसांनी अभय वाडेकर यांना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.