हवेली तालुक्यात भाजपाला भगदाड! कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष व कदमवाकवस्तीच्या सरपंचाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:49 PM2020-08-18T13:49:20+5:302020-08-18T13:54:29+5:30

पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईऐवजी त्यांना मोठ्या जबाबदारीची पदे दिली जात असल्याचा आरोप..

District President of Bjp worker union and Sarpanch of Kadamwakvasti resigned; bjp breaken in Haveli taluka | हवेली तालुक्यात भाजपाला भगदाड! कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष व कदमवाकवस्तीच्या सरपंचाचा राजीनामा

हवेली तालुक्यात भाजपाला भगदाड! कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष व कदमवाकवस्तीच्या सरपंचाचा राजीनामा

Next
ठळक मुद्देराजीनाम्यासंदर्भात सर्व कार्यकर्ते व मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करून घेतला निर्णय

पुणे (कदमवाकवस्ती) : हवेली तालुक्यातील झालेल्या जिल्हापरिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षविरोधी काम करूनही त्या पदाधिकाऱ्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप जिल्हा कार्यकारिणीमध्ये मोठे पदे जाहीर झाल्याने भाजप कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या पत्नी कदमवाकवस्तीच्या विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांनी मंगळवारी ( दि. १८) भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे हवेली तालुक्यातील भाजप पक्षाला भगदाड पडल्याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे.

         चित्तरंजन गायकवाड यांच्या पॅनेलने भाजपमध्ये असताना पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता घेऊन आपले वर्चस्व निर्माण केले होते.त्यांच्या पत्नी गौरी गायकवाड या जनतेतून सरपंच झाल्यानंतर भाजपाच्या पूर्व हवेलीतील पक्षबांधणीसाठी चित्तरंजन  यांच्यासमवेत मोलाची भूमिका बजावत होत्या.

        यावेळी बोलताना भाजप कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, नुकत्याच झालेल्या भाजप जिल्हा कार्यकारिणीमध्ये मी आणि माझी पत्नी गौरी गायकवाड यांनी पक्षाकडे कोणत्याही पदासाठी मागणी केली नव्हती. आम्ही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता भाजप पक्षासाठी अहोरात्र काम करत होतो. आणि भविष्यातही करणार होतो.परंतु पक्षातील काही पदाधिकारी व सदस्यांनी गेल्या जिल्हा परिषद,विधानसभा, लोकसभेच्या निवडणूकीमध्ये पक्षविरोधी काम केले होते त्या संदर्भात कारवाईसाठी मी वेळोवेळी पक्षाला सुचवुन देखील त्या पदाधिकारी व सदस्यांना पक्षाने कारवाई करण्याऐवजी पक्षात मोठ्या जबाबदारीची पदे दिली आहे. तसेच पक्षाकडून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी चित्तरंजन गायकवाड यांनी केला. राजीनाम्यासंदर्भात सर्व कार्यकर्ते व मार्गदर्शक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: District President of Bjp worker union and Sarpanch of Kadamwakvasti resigned; bjp breaken in Haveli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.