जिल्ह्याला मिळाले लाळखुरकत रोगावरील दहा लाख २० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:05+5:302021-09-10T04:17:05+5:30
पुणे जिल्ह्यात खेड, बारामती, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात लाळखुरकत रोगाचा प्रादुर्भाव होता. या रोगामुळे अनेक जनावरे दगावली. जनावरांमधील साथरोग ...
पुणे जिल्ह्यात खेड, बारामती, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात लाळखुरकत रोगाचा प्रादुर्भाव होता. या रोगामुळे अनेक जनावरे दगावली. जनावरांमधील साथरोग असल्याने इतर पशुधनांचे आरोग्य धोक्यात आले होते. या संदर्भात पशुसंवर्धन विभागाने जनावरांची तपासणी मोहीम हाती घेतली होती. मात्र, लसीकरण झाले नव्हते. जिल्ह्याला लस मिळावी अशी मागणी, जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस मिळाली. केंद्राकडून राज्याला ३१ लाख डोस मिळाले आहे. यातील अहमदनगर जिल्ह्याला १४ लाख ३९ हजार ६९२ डोस तर २८ हजार ७९४ व्हायल्स देण्यात आल्या. बीड जिल्ह्याला सहा लाख ७९ हजार ३२७ डोस, तर १३ हजार ६८७ व्हायल्स देण्यात आल्या आहेत.
कोट
जिल्ह्यात जवळपास दहा लाखांच्या आसपास पशुधन आहे. या पशुधनांचे लसीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. काही आजारांवरील लसी यापूर्वी जिल्ह्याला मिळाल्या आहेत. लाळखुरकत रोगावरील लस उपलब्ध झाल्यामुळे पशुधनांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार आहे.
कोट
केंद्राकडून लाळखुरकत रोगावरील लस उपलब्ध झाली आहे. त्यानुसार जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. पशुपालकांनी याची नोंद घेऊन त्यांच्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
-शिवाजी विधाटे, पशुसंवर्धन अधिकारी