जिल्ह्याला मिळाले लसींचे ३ लाख २८ हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:12+5:302021-09-08T04:16:12+5:30
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात विक्रमी अडीच लाखांचे लसीकरण झाल्यावर जास्तीत जास्त लस ग्रामीण ...
जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. जिल्ह्यात विक्रमी अडीच लाखांचे लसीकरण झाल्यावर जास्तीत जास्त लस ग्रामीण भागासाठी मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार सोमवारी पुन्हा दीड लाखाच्यावर लस जिल्ह्याला मिळाली. जिल्ह्यात आठशेहून अधिक लसीकरण केंद्र आहेत. ही मिळालेली लस समप्रमाणात या केंद्रांना वितरीत केली जाणार आहे. लसीच्या डोस वितरणामध्ये सर्वाधिक बारामती तालुक्यात २१ हजार डोस वितरीत करण्यात आले. तर दौंड, पुरंदर, इंदापूर, हवेली, जुन्नर तालुक्यांत प्रत्येकी १३ हजार ५००, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी आणि शिरूर तालुक्यांत प्रत्येकी ११ हजार ५०० लसीचे डोस वितरीत करण्यात आले. तर कोव्हॅक्सिन लसीचे ७ हजार ५०० डोस वितरीत करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक तालुक्याला सरासरी ३०० ते ५०० च्या आसपास लसीचा पुरवठा करण्यात आला आहे.
पुणे शहराला कोविशिल्डच्या ९० हजार डोस वितरीत करण्यात आले. तर पिंपरी-चिंचवडला कोविशिल्डच्या ६० हजार डोस देण्यात आले. तर कोव्हॅक्सिनचे ६ हजार डोस पुणे शहराला तर, पिंपरीला ५ हजार ८१० डोस देण्यात आले. दोन्ही लसींचे डोस मिळूण जिल्ह्यासाठी ३ लाख २८ हजार २१० लसींचे डोस सोमवारी रात्री मिळाले.
कोट
ग्रामीणमध्ये मागील आठ दिवसांत तब्बल दोन लाख लसींचे डोस
मागील दोन आठवड्यांत तब्बल साडेचार ते पाच लाख लसींचे डोस मिळाले. त्यामध्ये ऑगस्टच्या अखेरीस दोन लाख तर, मागील आठ दिवसांत अडीच लाखांहून अधिक लसीचे डोस वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस तरी ग्रामीणमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबवून जास्तीत जास्त लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- डॉ. सचिन येडके, जिल्हा लसीकरण अधिकारी