जिल्ह्याला १५ व्या वित्त आयोगातून मिळाले ६८ कोटी ४१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:25+5:302021-05-01T04:11:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्राम विकास विभागाकडून मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा तिसरा टप्याचा अनुबंधित निधी जिल्ह्यातील ...

The district received Rs 68.41 crore from the 15th Finance Commission | जिल्ह्याला १५ व्या वित्त आयोगातून मिळाले ६८ कोटी ४१ लाख

जिल्ह्याला १५ व्या वित्त आयोगातून मिळाले ६८ कोटी ४१ लाख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्राम विकास विभागाकडून मिळणारा १५ व्या वित्त आयोगाचा तिसरा टप्याचा अनुबंधित निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना शुक्रवारी प्राप्त झाला. जवळपास ६८ कोटी ४१ लाख ३३ हजारांचा निधी १,४०४ ग्रामपंचयातींना मिळाला आहे. या सोबतच मुंद्राक शुल्कचे २६ कोटी २ लाख रूपये ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आले आहे. या निधीमुळे कोरोना काळात योग्य व्यवस्थापन करणे गावांना शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली

केंद्राकडून गावांना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मिळत असताे. २०२०-२१ या आर्थीक वर्षाच्या अनुबंधीत ग्रँडच्या तिसऱ्या हप्त्यापोटी १,४०४ ग्रामपंचायतींना ६८ कोटी ४१ लाख ३३ हजारांचा निधी मिळाला. हा निधी लोकसंख्येच्या ९० टक्के व क्षेत्रफळाच्या १० टक्के या प्रमाणे वितरीत करण्यात आला आहे. या सोबतच १३ पंचायत समित्यांनाही या निधी अंतर्गत ८ कोटी ५५ लाख १७ हजार रूपयांचा निधी मिळाला आहे, असे पानसरे यांनी सांगितले.

Web Title: The district received Rs 68.41 crore from the 15th Finance Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.