जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेणार

By admin | Published: February 27, 2016 04:32 AM2016-02-27T04:32:54+5:302016-02-27T04:32:54+5:30

राज्यात यंदा टंचाईची झळ अधिक असल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ ही दोन वर्षे बंद असलेली योजना शासनाने पुन्हा सुरू केली असून, त्यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्यात येणार

The district will take 1,273 farmers | जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेणार

जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेणार

Next

पुणे : राज्यात यंदा टंचाईची झळ अधिक असल्याने ‘मागेल त्याला शेततळे’ ही दोन वर्षे बंद असलेली योजना शासनाने पुन्हा सुरू केली असून, त्यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी काटकर यांनी सांगितले.
या वर्षी जिल्ह्यात फेबु्रवारीतच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. आताच टँकर पन्नाशीवर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने नुकताच ४० कोटी ९१ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीही दिली आहे. यातून नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरत्या नळपाणी योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहीर खोलीकरण व गाळ काढणे आदी कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यात आता शासनाच्या कृषी विभागातर्फे टंचाईग्रस्त भागात शेतकऱ्याकडे स्वत:ची सिंचनव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून मागेल त्याला शेततळे देण्यात येईल. यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळी घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. (प्रतिनिधी)

यासाठी आवश्यक पात्रता
मदत व पुनर्वसन विभागाकडून निधी उपलब्ध होऊन सदर योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी, तसेच शेततळ्याकरिता निवडलेली जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे, सामुदायिक शेततळे, बोडी याचा लाभ घेतलेला नसावा.
दारिद्र्यरेषेखालील शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना प्रथम प्राधान्य. प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. ४५
दिवसांत अर्ज सादर करणे. गावात मागील ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेली असावी.

आॅनलाईन प्रक्रिया
वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या विभागातर्फे दिल्या जातात, ते तालुका पातळीवरून याद्या करून त्याचे प्रस्ताव घेतात. मात्र, यात अधिकारी, पदाधिकारी यांच्या जवळच्यांनाच फायदा होता. पण, शेततळ्याची मागणी आॅनलाई असून प्रथम नोंद करणाऱ्यास प्राधान्य आहे.
https://aaplesarkar.maharashtra.gov.in संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज भरायचा आहे. मूळ अर्ज भरून स्वत:च्या स्वाक्षरीसह सर्व कागदपत्रे स्कॅन
करून ठेवावीत. ही प्रक्रिया
सोमवारपासून सुरू होईल.
 

Web Title: The district will take 1,273 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.