जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर, मृत्यूदर १ टक्क्याहून कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:14 AM2021-02-23T04:14:54+5:302021-02-23T04:14:54+5:30

पुणे : मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून एक वर्ष पूर्ण होत आहे. आॅक्टोबर ते जानेवारी या चार ...

District's positivity rate at 10 per cent, mortality rate less than 1 per cent | जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर, मृत्यूदर १ टक्क्याहून कमी

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांवर, मृत्यूदर १ टक्क्याहून कमी

Next

पुणे : मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून एक वर्ष पूर्ण होत आहे. आॅक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये रुग्णांना आकडा आटोक्यात आला होता. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. पुणे जिल्ह्याचा आठवड्याभराची कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी (पॉझिटिव्हिटी रेट) १० टक्क्यांवर पोहोचली आहे. मृत्यूदर मात्र १ टक्क्याच्या खाली आहे. पॉझिटिव्हिटी रेटच्या बाबतीत पुणे जिल्हा राज्यात बाराव्या क्रमांकावर आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६७ दिवसांवर पोहोचला आहे.

गेले अकरा महिने सर्वजण कोरोनाशी सातत्याने लढा देत आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्व व्यवहार पूर्ववत झाले आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला. युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यावर पुन्हा लॉकडाऊन करावे लागले. भारतातही मुख्यत: महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात बिबवेवाडी, कोथरूड, हडपसर आणि सिंहगड रस्ता हे हॉटस्पॉट ठरू लागले आहेत.

जिल्ह्यात २३ ते २९ जानेवारी दरम्यान पॉझिटिव्हिटी रेट ६.८ टक्के होता. १३ ते १९ जानेवारी दरम्यान हा आकडा १० टक्क्यांवर पोहोचला आहे. मृत्यूदर मात्र १.२ टक्कयांवरुन ०.७ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. एकीकडे चाचण्यांची संख्याही वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.१२ टक्के इतके आहे. कोरोनाचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी हात धुणे, मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात ९ मार्च २०२० ते १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत २२,२४,६१० इतक्या चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४ लाखांपर्यंत पोचला आहे. अकरा महिन्यांचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट १७.८ इतका आहे. मृत्यूदर सरासरी २.३ टक्के इतका आहे.

-----------------------

आठवडा तपासणी कोरोनाबाधित पॉझिटिव्हिटी मृत्यू

२३-२९ जानेवारी४५,३९८ ३१२२ ६.८ १.२

३०जाने-५ फेब्रु५१,०१९ २९५३ ५.७ १.५

६-१२ फेब्रुवारी३८,२८८ ३२८९ ८.५ १.१

१३-१९ फेब्रुवारी४९,३५० ४९५४ १० ०.७

------------------------------------------------

्रविभागनिहाय आकडेवारी (१३ ते १९ फेब्रुवारी)

विभाग तपासणीरुग्ण पॉझिटिव्हिटी रेट मृत्यूदर

पुणे मनपा २५,०९३ २६०७ १०.३ ०.८

पिं-चिं मनपा १२,३३२ १२०० ९.७ ०.१

पुणे ग्रामीण ११,६६२ ११२९ ९.६ १.२

Web Title: District's positivity rate at 10 per cent, mortality rate less than 1 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.