पुण्यातील स्मार्ट फुटपाथचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 04:40 PM2018-07-29T16:40:18+5:302018-07-29T16:42:01+5:30

पुणे महानगरपालिका अाणि स्मार्ट सिटीकडून शहरातील विविध पदपथांचे सुशाेभिकरण करण्यात अाले अाहे. परंतु काही समाजकंटकांकडून ते विद्रुप करण्याचे काम करण्यात येत अाहे.

The distruction of smart pavement in Pune | पुण्यातील स्मार्ट फुटपाथचे नुकसान

पुण्यातील स्मार्ट फुटपाथचे नुकसान

Next

पुणे : पुणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने हाेत अाहे. स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशन अाणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकासकामे करण्यात येत अाहेत. यात पुण्यातील महत्त्वाच्या अश्या जंगली महाराज रस्त्याच्या पदपथांची विशिष्ट प्रकारे रचना करण्यात अाली अाहे. त्याचे सर्वत्र काैतुक झाले. परंतु काही समाजकंटकांकडून या पदपथांवरील रचना उद्वस्त करण्याचे काम करण्यात येत अाहे. जंगली महाराज रस्त्यावरील एका पदपथावर कुठलेही वाहन येऊ नये यासाठी बांधण्यात अालेले सिमेंटचे ठाेकळे समाजकंटकांकडून ताेडण्यात अाले अाहेत. त्यामुळे अाकर्षक असे पदपथ विद्रुप हाेत अाहेत. 


    पुणे महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने पुण्यातील अनेक पदपथ सुशाेभित करण्यात अाले. त्यातही पुणेकरांच्या जीव्हाळ्याचा असलेला जंगली महाराज रस्त्यावरील पदपथांची रचना अाकर्षक पद्धतीने करण्यात अाली अाहे. येथे नागरिकांना बसण्याची तसेच विविध खेळ खेळण्याची साेय करण्यात अाली अाहे. त्याचबराेबर पदपथ माेठे केल्याने नागरिकांना चालने सुकर झाले अाहे. उपनगरातून अालेल्या नागरिकांसाठी हा पदपथ म्हणजे क्षणभर विश्रांतीचे ठिकाण झाले अाहे. परंतु काही समाजकंटकांना हे नवे बदल पाहवत नसल्याचे चित्र अाहे. पदपथावरील दुचाकींना अडथळा म्हणून लावण्यात अालेले अडथळे ताेडण्यात अाले अाहेत. त्याचबराेबर अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचेही चित्र अाहे. 


    स्मार्ट सिटीकडून शहरात शेअर सायकल याेजना राबविण्यात अाली. यात अनेक सायकल कंपन्यांनी भाग घेतला. कमी दरात नागरिकांना भाड्याने अाॅनलाईन पद्धतीने सायकली मिळू लागल्याने नागरिकांची चांगली साेय झाली. त्याचबराेबर प्रदूषणातही घट हाेण्यास या सायकल याेजनेमुळे मदत हाेत अाहे. परंतु काही दिवसांपूर्वी एका कंपनीची सायकल झाडावरील फांदीवर लटकविल्याचे प्रकरण समाेर अाले हाेते. अनेकदा काही जणांकडून या सायकली कुठेही साेडल्या जात अाहेत. तर काहींनी या सायकलींचे नुकसानही केले अाहे. त्यामुळे शहर एकीकडे स्मार्ट हाेत असताना, नागरिक सुद्धा स्मार्ट हाेणार का असा प्रशन उपस्थित केला जात अाहे. 

Web Title: The distruction of smart pavement in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.