दिव्यांग मुलांनी चाखला आंब्यांचा गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 08:34 PM2019-05-06T20:34:37+5:302019-05-06T20:46:27+5:30

सध्या उष्णतेच्या लाटेत शरीराची लाही लाही होत असताना पुणेकरांसाठी एक सुखावह आणि आनंदाची बाब म्हणजे आंब्यांचे इनकमिंग..

Divang children tast sweet mangoes | दिव्यांग मुलांनी चाखला आंब्यांचा गोडवा

दिव्यांग मुलांनी चाखला आंब्यांचा गोडवा

googlenewsNext
ठळक मुद्देदृष्टीहीन व विशेष मुलांसाठी आंबे खाणे स्पर्धा निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे मँगो मेनियाचे आयोजन

पुणे : सध्या उष्णतेच्या लाटेत शरीराची लाही लाही होत असताना पुणेकरांसाठी एक सुखावह आणि आनंदाची बाब  म्हणजे आंब्यांची घाऊ गर्दी. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हापूस आंब्याची चव चाखणे महागाईच्या काळात सामान्यांना अवघड झाले आहे.पण यासोबतच मनसोक्त आंबे खाण्याची मजा समाजातील वंचित विशेष मुलांना लुटता आली तर.. अशा मुलांना आंबे खाण्याचा आनंद मिळावा, यासाठी पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. मँगो मेनियामध्ये पिवळ्या धम्मक हापूस आंब्यांची मेजवानी घेत स्पर्श आणि चवीने पुण्यातील ३०० हून अधिक वंचित-विशेष मुलांनी आंब्याचा गोडवा चाखला. 


निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे दिव्यांग आणि वंचित विशेष मुलांसाठी निरंजन मँगो मेनिया या आंबे खाणे स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. यावेळी सीआयएएन हेल्थ केअरचे सुरज झंवर, अरिहंत जेनरिक ग्रुप वेलनेस इंडिया चे विपुल जैन, निरंजन सेवाभावी संस्थेचे धीरज भूत, स्वप्नील देवळे, जगदीश मुंदडा, डॉ. नवनीत मानधनी आदी उपस्थित होते. चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे यंदा ९ वे वर्ष होते.
    सुरज झंवर म्हणाले, आंबा हे लहान मुलांचे अतिशय आवडते फळ. आपल्या मुलांना हे फळ चाखण्याची संधी मिळते. परंतु विशेष मुलांना देखील आंबे खाण्याचा मनमुराद आनंद लुÞटता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबे खाण्याच्या आयोजित केलेल्या स्पधेर्चा उपक्रम कौतुकास्पद आहे.  
    विपुल जैन म्हणाले, विशेष मुलांना आंबे खाताना पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे. वंचित मुलांसाठी राबविलेला हा उपक्रम तर उत्तम आहेच, परंतु याबरोबर वृक्षसंवर्धनासाठी संस्थेने केलेले प्रयत्न देखील कौतुकास्पद आहेत.    
    आंबे खाणे स्पधेर्तील आंब्याच्या सुमारे २ हजार ५०० कोयी संस्थेचे कार्यकर्ते राजगड-वेल्हे आणि मुळशी परिसरात पेरणार असून वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. लोकमंगल फाऊंडेशन, धर्मवीर संभाजीराजे अनाथ आश्रम, नूतन समर्थ विद्यालय, पुणे अंध शाळा, माहेर फाऊंडेशन आदी संस्थेतील ३०० हून अधिक विशेष मुलांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. 
.............
* परदेशी पाहुण्यांनीही घेतला आंबे खाण्याचा आनंद 
निरंजन सेवाभावी संस्थेतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंबे खाणे स्पर्धेत विशेष वंचित मुलांबरोबर परदेशी पाहुण्यांनीही सहभाग घेत आंब्यांवर ताव मारला. इतरांप्रमाणेच पिवळ््याधम्मक, रसाळ आणि चविष्ठ आबांचा गोडवा चाखण्याचा मोह त्यांना देखील आवरला नाही. सामाजिक संस्थांचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटन, आॅस्ट्रेलिया वरून आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी  संस्थेतील मुलांशी संवाद साधत कार्यक्रमात सहभाग घेलता.  
 

Web Title: Divang children tast sweet mangoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.