दिवेकर अकादमी, पीवायसी जिमखाना ‘अ’ उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:20 AM2021-03-04T04:20:05+5:302021-03-04T04:20:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक बारा ...

Divekar Academy, PYC Gymkhana ‘A’ in the semifinals | दिवेकर अकादमी, पीवायसी जिमखाना ‘अ’ उपांत्य फेरीत

दिवेकर अकादमी, पीवायसी जिमखाना ‘अ’ उपांत्य फेरीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : थर्ड आय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या वतीने आयोजित जेझेड थर्ड आय करंडक बारा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत दिवेकर क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना अ या संघांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भूगाव येथील द पूना वेस्टर्न क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत आर्यन यादवच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने २२ यार्ड्स अ संघाचा पराभव करत आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात यश अधिकारीच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना अ संघाने एच. के. बाऊन्स संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : साखळी फेरी :

२२ यार्डस अ : २५ षटकात ६ बाद १०१ धावा, आर्यन पेंडसे १४, ईशान झंडू १३, ओमकार डी. १२, आर्यन यादव ३-११, आदित्य कापरे १-१३, श्रीप्रसाद कुलकर्णी १-१२ पराभूत वि. दिवेकर क्रिकेट अकादमी : १२.१ षटकात २ बाद १०३ धावा, संतोष चौहान नाबाद ३७, ईश्वरी अवसरे २९, ओमकार रसाळ नाबाद १३, श्रीनिवास निंबाळकर २-९; सामनावीर - आर्यन यादव; दिवेकर क्रिकेट अकादमी संघ ८ गडी राखून विजयी

एच.के. बाऊन्स : २४.४ षटकात सर्वबाद ९२ धावा, वीर चोरडिया २४, सूर्या निकम १९, सोहम काकडे १२, अर्जुन गायकवाड ११, हर्षल पासलकर २-९, यश अधिकारी २-१२ पराभूत वि. पीवायसी हिंदू जिमखाना अ : १४.५ षटकात २ बाद ९३ धावा, यश अधिकारी नाबाद ३४, शौनक टेंभुर्णीकर नाबाद १४, सोहम काकडे १-१२; सामनावीर - यश अधिकारी; पीवायसी अ संघ ८ गडी राखून विजयी.

Web Title: Divekar Academy, PYC Gymkhana ‘A’ in the semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.