क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २३ गावांची विभागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:40+5:302021-07-02T04:08:40+5:30

पुणे : राज्य शासनाच्या अधिसूचनेनंतर पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांना, महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट ...

Division of 23 villages under the jurisdiction of the Regional Office | क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २३ गावांची विभागणी

क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २३ गावांची विभागणी

Next

पुणे : राज्य शासनाच्या अधिसूचनेनंतर पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांना, महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

या २३ गावांमधील दैनंदिन कामकाज व्यवस्थित होण्यासाठी या गावांचा समावेश महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत.

यानुसार त्या ८ क्षेत्रीय कार्यालयांचा विस्तार करून, संबंधित कार्यालयांमध्ये कोणती गावे नव्याने समाविष्ट झाली याची माहिती क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहे. यानुसार ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी संबंधित ग्रामपंचायतीची सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मदत घेऊन त्वरित ताब्यात घ्यावीत व त्याचा अहवाल आयुक्तांना द्यायचा आहे. याचबरोबर या क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी गावांमधील नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरवण्यासाठी, संबंधित गावात सहायक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व या सहायक अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीमधून तात्पुरत्या स्वरुपात काम पाहण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

----------------

क्षेत्रीय कार्यालये व त्यामध्ये समाविष्ट केलेली गावे-

१) हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय :- औताडे-हंडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बु.

२) वारजे-कर्वेनगर : कोंढवे-धावडे, कोपरे

३) कोंढवा-येवलेवाडी : गुजर निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी

४) नगररस्ता-वडगाव शेरी : वाघोली

५) धनकवडी-सहकारनगर : जांभूळवाडी, केळेवाडी, मांगडेवाडी, भिलारवाडी

६) सिंहगड रस्ता : नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, नांदेशी, सणसनगर, नऱ्हे

७) औंध-बाणेर : म्हाळुंगे, सूस

८) कोथरूड-बावधन : बावधन

Web Title: Division of 23 villages under the jurisdiction of the Regional Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.