घटस्फोट टळला! अन् १५ वर्षे दुभंगलेले कुटुंब लोकन्यायालयात आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:17 PM2023-02-13T13:17:54+5:302023-02-13T13:20:11+5:30

लोकन्यायालयात अशी ६ जोडप्यांनी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निश्चय केला

Divorce avoided! And the family, divided for 15 years, came together in the People's Court | घटस्फोट टळला! अन् १५ वर्षे दुभंगलेले कुटुंब लोकन्यायालयात आले एकत्र

घटस्फोट टळला! अन् १५ वर्षे दुभंगलेले कुटुंब लोकन्यायालयात आले एकत्र

Next

पुणे : लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसारात दोन मुले, एक मुलगी अशी फुले फुलली. त्यानंतर त्यांच्यात गैरसमजाचा वणवा पेटला. त्यातून ती मुलांसह वेगळी राहू लागली. तिने कौटुंबिक हिंसाचाराची केस केली. न्यायालयाने पोटगीही मंजूर केली. त्यांची घटस्फोटासाठी केस सुरू होती. २००९मधील या केससाठी ते दर तारखेला कोर्टात येत. न्यायालयाने पुढाकार घेऊन त्यांचे समुपदेशन केले. मुलांनी आम्हाला दोघेही हवेत, असे सांगितले. त्यानंतर आता ते तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. लोकन्यायालयात ही केस शनिवारी निकाली काढण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्गे यांच्या प्रयत्नांनी एक कुटुंब पुन्हा एकत्र आले. लोकन्यायालयात अशी ६ जोडप्यांनी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निश्चय केला.

तो हडपसरला राहत असून एका खासगी कंपनीत कामाला होता. तीन मुलांनंतर त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊन ते वेगळे राहू लागले. मुले तिच्याकडे राहू लागली. तिने पोटगीसाठी अर्ज केला. न्यायालयाने तिला पोटगी मंजूर केली. कौटुंबिक हिंसाचाराची केसही दाखल होती. ते नियमित केससाठी न्यायालयात येत होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्गे यांच्या हे लक्षात आले. त्यांनी दोघांना समुपदेशनासाठी बोलावले. एकमेकांवर इतके आरोप केले, त्यातून आता एकत्र येण्यासारखे काही राहिले नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांनी मुलांना बोलावले. मुले तयार झाली. मुलांनी आम्हाला दोघे हवे असल्याचे सांगितले. त्याचा परिणाम झाला. दोघांनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर सर्व बाबी पूर्ण करून लोक न्यायालयात ते एकत्र आले. इतर पाच प्रकरणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चिंतामण शेळके यांच्या न्यायालयात निकाली निघाले. लोकन्यायालयात ५ जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्यावर संमती दर्शविली. या जोडप्यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक व विधी सेवा प्राधिकरण सदस्य सचिव मंगल कश्यप यांनी पुष्पगुच्छ देऊन भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. दोन्ही घरातील इतरांचा त्यांच्या संसारात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ते गेली ५ वर्षे वेगळे राहात होते. तिचा पतीही एकत्र राहायला तयार होता. तुम्ही एकमेकांना वेळ द्या. ॲड. प्रियाल घोष यांनी मुस्लिम कुटुंबातील महिलेला वास्तवाची जाणीव करून तिचे समुपदेशन केले. त्यानंतर ते एकत्र आले.

प्रेमविवाहानंतर आर्थिक वादातून विभक्त

त्यांचा प्रेमविवाह झालेला. दोन मुले झाली. त्यानंतर त्यांच्यात आर्थिक कारणांवरून वाद होऊ लागले. जवळपास २ वर्षे ते वेगळे राहात होते. या वेगळे राहिल्याचा त्याच्यावर मानसिक परिणाम झाला. औषधोपचार सुरू झाले. वेगळे झाल्याने होत असलेली फरपट लक्षात घेऊन दोघांनी समंजसपणा दाखविला. ॲड. ययाती कोठेकर यांनी त्यांच्यात समेट घडवून आणला आणि ते पुन्हा एकत्र आले.

Web Title: Divorce avoided! And the family, divided for 15 years, came together in the People's Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.