पतीपासून घटस्फोट घे; महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करत बदनामी

By भाग्यश्री गिलडा | Published: July 1, 2024 07:28 PM2024-07-01T19:28:37+5:302024-07-01T19:28:48+5:30

आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली

Divorce from husband Defamation by viralizing morphed photos of women | पतीपासून घटस्फोट घे; महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करत बदनामी

पतीपासून घटस्फोट घे; महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करत बदनामी

पुणे : महिलेचे मॉफ केलेले अश्लील फोटो पती व नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने रविवारी (दि. ३०) कोंढवा पोलिसांना फिर्याद दिली आहे. 

अधिक माहितीनुसार, हा प्रकार २५ जून ते ३० जून या कालावधीत घडला आहे. अनोळखी अज्ञात मोबाईल धारकाने २५ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पती, मित्र व नातेवाईक यांना पाठवले. त्यामुळे फिर्य़ादी व त्यांच्या पतीमध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यानंतर २९ जून रोजी आरोपीने महिलेच्या व्हॉट्सअॅपवर व्हाईस कॉल करुन फिर्य़ादी यांना पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. फिर्य़ादी यांनी याला नकार दिला असता आरोपीने वारंवार फोन करुन पुणे स्टेशन येथे भेटायला बोलवले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

Web Title: Divorce from husband Defamation by viralizing morphed photos of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.