दिव्यांग नेमबाजी : आकाश कुंभार यांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:22 AM2018-08-29T02:22:49+5:302018-08-29T02:23:22+5:30
१० मीटर पिस्टल प्रकारात साधले लक्ष्य
पुणे : अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या सहाव्या दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेत पुण्याच्या आकाश कुंभार यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दिव्यांगांच्या एसएच-१ ए-१४९, १० मीटर एअर पिस्टल प्रकारात ३४६ गुण संपादन करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.
गुजरातच्या केतन सिंघल यांनी ३४४ गुणांसह रौप्यपदक जिंकले. आकाश कुंभार यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. आकाश कुंभार गेल्या वर्षभरापासून म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात गन फॉर ग्लोरी अकादमीमध्ये मार्गदर्शक पवन सिंग, मार्गदर्शक विद्या जाधव व मोनिका पाल यांच्या मार्गदर्शनखाली सराव करीत आहेत. चेन्नई येथे ३० आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या
जी. व्ही. मावळणकर स्पर्धेत ते सहभागी होणार आहेत.
सिमरन नागाळेचे सुवर्ण यश
पुणे : दक्षिण कोरिया येथे झालेल्या किमुनयॉँग चषक खुल्या तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या सिमरन नागाळे हिने जी १ प्रकारात सुवर्णपदक जिंकले. सिमरन ही हुजूरपागा इंग्लिश मीडियम प्रशालेत शिकत असून प्रवीण सोनकुळे व अबोली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.