भारतातील पहिले निवासी दिव्यांग महाविद्यालच भुषणावह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:28 AM2020-12-11T04:28:47+5:302020-12-11T04:28:47+5:30
-- टाकळी हाजी : टाकळी हाजी येथील न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालय हे दिव्यांग अपंगासाठीचे भारतातील पहिले निवासी महाविद्यालय ...
--
टाकळी हाजी : टाकळी हाजी येथील न्यू व्हिजन कला वाणिज्य महाविद्यालय हे दिव्यांग अपंगासाठीचे भारतातील पहिले निवासी महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असणे हा पुणे विद्यापीठाचा सन्मान असून , स्वतः दिव्यांग असतानाही परिस्थितीशी झगडून दिव्यांग अपंगासाठी महाविद्यालय उभ्या करणाऱ्या ह्या महाविद्यालयाच्या संस्थापिका जाई खामकर यांचे काम गौरवास्पद आहे. विद्यापीठाशी हे महाविद्यालय भूषणावह ठरेल असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
टाकळी हाजी (ता.शिरुर ) येथील मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेच्या न्यू व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन व संरक्षण भिंतीचे उद्घघाटन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आले . यआवेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. नितीन करमळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते.
डाॅ. करमळकर म्हणाले की, जाई खामकर या ह्या महाविद्यालयाच्या माध्यमातून दिव्यांग अपंगांसाठी दृष्टी देण्याचे मोठे कार्य हाती घेऊन पुढे चाललेल्या आहेत दरम्यान त्यांच्या या कार्यासाठी विद्यापीठ स्तरावरून व त्यांना जिथे मदत लागेल तिथे आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यावेळी म्हणाले.
जाई खामकर यांचे कार्य समाजाला प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाणारे आहे. म्हणून त्यांच्या ह्या कामासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आप आपल्या परीने मदत करावी असे अवाहन माजी वरिष्ठ परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले .जाई खामकर यांच्याकडून दिव्यांग व अपंगासाठी होत असलेल्या निवासी महाविद्यालय उभारणीच्या कामामुळे टाकळी हाजी परिसराचा संपूर्ण देशात नावलौकीक वाढत आहे . दरम्यान त्यांच्या ह्या कामासाठी आपण व परिसरातील सर्व ग्रामस्थ ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत असे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले
यावेळी मळगंगा अंध अपंग संस्थेच्या अध्यक्षा जाई खामकर , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी वित्त व लेखाधिकारी डॉ. एम. एस. जाधव , हायर कंपनीच्या रांजणगाव येथील प्लान्टचे प्रमुख पंकज चावला , संदीप लगड , प्रा.धनंजय भोळे यांची भाषणे झाली.
यावेळी पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे , माजी नायब तहसीलदार अर्जुन थोरात , मळगंगा अंध अपंग संस्थेचे सचिव सुजय पाचंगे , बन्सी घोडे , डॉ. बाळकृष्ण लळीत , डॉ. पद्माकर गोरे , डॉ. दत्तात्रय वाबळे , विनायक ठाकरे , कमल गादिया ,सोमेश अगरवाल , संचिता कुमर , दीपक भारव्दाज ,अशोकराव गाढवे , सुभाष मिठकरी , गणेश पवार , नंदकुमार पवार , महादेव निमकर , अश्विनी थोरात , उज्वला इचके , प्राचार्य तुकाराम रासकर यांच्यासह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता कारंडे यांनी केले.आभार डॉ. पद्माकर गोरे यांनी मानले.
-