पुरंंदरमध्ये दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:15 AM2021-09-17T04:15:02+5:302021-09-17T04:15:02+5:30

सासवड : पुरंदर तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकत्रित घेऊन पुरंदर तालुका दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून या माध्यमातून ...

Divyang will set up an industrial co-operative society in Purandar | पुरंंदरमध्ये दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करणार

पुरंंदरमध्ये दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करणार

सासवड : पुरंदर तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना एकत्रित घेऊन पुरंदर तालुका दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करून या माध्यमातून वेगवेगळे उद्योग, व्यवसाय उभारून आर्थिक निधी उभा करता येईल. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. यासाठी जेवढा निधी आणि उपाययोजना करता येतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आगामी काळात दिव्यांग भवनची उभारणी करून एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.

सासवड ( ता. पुरंदर ) येथील नगर परिषदेच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पाच टक्के दिव्यांग निधीचे १७ लाख वितरित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदी जगताप, उपनगराध्यक्षा पुष्पा जगताप, मुख्याधिकारी निखिल मोरे, नगरसेवक विजयराव वढणे, सुहास लांडगे, मनोहर जगताप, अजित जगताप, संदीप राऊत, मंगल म्हेत्रे, डॉ. अस्मिता रणपिसे उपस्थित होते. प्रहार अपंग संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, संजय गांधी योजना समितीचे सदस्य संभाजी महामुनी, संदीप जगताप, दत्तात्रय दगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सासवड नगरपरिषदेच्या वतीने ज्या ठिकाणी व्यावसायिक दुकाने उभारण्यात येतील त्या सर्व ठिकाणी दिव्यांगांना राखीव दुकाने ठेवण्यात येतील. त्याचबरोबर उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी मदतही करण्यात येईल. येत्या दिवाळी मध्ये तालुक्यातील पाच दिव्यांग व्यक्तींना प्रवास करण्यासाठी गाड्या देण्यात येतील असेही आमदार जगताप यांनी या वेळी सांगितले.

मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सर्व दिव्यांगांची लवकरच एक मिटिंग आयोजित करून विविध योजनांची माहिती दिली जाईल असे सांगितले. उपनगराध्यक्षा पुष्पाकाकी जगताप यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रहार अपंग संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी प्रास्ताविक केले, संभाजी महामुनी यांनी सूत्रसंचालन केले, तर संदीप जगताप यांनी आभार मानले.

१६ सासवड

सासवड येथे संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले.

160921\img-20210916-wa0013.jpg

फोटो ओळ ; सासवड येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.

Web Title: Divyang will set up an industrial co-operative society in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.