दिवाळीत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ, तीन दिवसांत दहा हजार वाहनांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:49 AM2017-10-24T00:49:37+5:302017-10-24T00:49:58+5:30
पुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली.
पुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. या तीन दिवसांत ८ हजार ६८५ दुचाकींची, ११४५ चारचाकी व ५७० इतर वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. त्यातून आरटीओला १७ कोटी ५ लाख रुपयांचा महसूल मिळाला़
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) वाहनांची नोंद झाल्यानंतर ते ग्राहकांना दिले जाते. दर वर्षी दसरा व दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली जाते. दसरा, वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवशी वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. दि. १६ (धनत्रयोदशी), १७ (नरक चतुर्दशी) व १८ आॅक्टोबर (लक्ष्मीपूजन) या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची विक्री झाली. त्याचबरोबर सणांच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यांत आतापर्यंत एकूण ३६ हजार वाहने पुणेकरांनी घरी नेली आहेत. मागील वर्षी या
काळात २५ हजार वाहनांची विक्री झाली होती.
आरटीओच्या आकडेवारीनुसार, दर वर्षी शहराच्या वाहनसंख्येत सरासरी दीड लाख नवीन वाहनांची
भर पडते. त्यानुसार दरमहा
१० ते १२ हजार नवीन वाहनांची
नोंदणी होते. तर, दिवाळीमध्ये
अवघ्या ३ दिवसांत १० हजार
४०० वाहने विकली गेली
आहेत. दिवाळीनिमित्त वाहन कंपन्यांनी मोठ्या सवलती जाहीर केल्या होत्या. त्याचाही लाभ ग्राहकांनी उचलला आहे.
नुकतेच कॉलेजला जाऊ लागलेल्या महाविद्यालयीन युवक-युवतींना पालकांकडून दिवाळीनिमित्त दुचाकींची भेट देण्यात आली. त्याचबरोबर अनेक कुटुंबांनी यंदाच्या दिवाळीत चारचाकी खरेदी करण्याचे स्वप्नाला मूर्त स्वरूप दिले.
।जीएसटीचा खरेदीवर परिणाम नाही
जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी होती. जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचा फटका वाहन खरेदीला बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, लोकांनी वाढत्या किमतीची पर्वा न करता वाहन खरेदीला भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूकव्यवस्था चांगली नसल्याने दुचाकी खरेदी करणाºयांची संख्या मोठी आहेच. मात्र, त्याचबरोबर सध्या चारचाकी वाहन खरेदी करणाºयांच्या संख्येतही मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने चारचाकी वाहनांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सप्टेंबर २०१७मध्ये साडेसहा हजार, तर १ ते २३ आॅक्टोबरपर्यंत २ हजार ५०० चारचाकी वाहनांची खरेदी झाली. सप्टेंबर महिन्यात १४ हजार, तर १ ते २३ आॅक्टोबरदरम्यान ११ हजार दुचाकी विकल्या गेल्या आहेत. इतर १,६०० वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. दसरा व दिवाळीनंतर ३६ हजार नवीन वाहने नव्याने रस्त्यावर येत असल्याने त्याचा निश्चितच परिणाम रस्त्यावरच्या वाहतुकीवर होईल.
।वाहनाच्या लकी नंबरलाही तुडुंब प्रतिसाद
आरटीओने नवीन वाहनांसाठी ग्राहकांना हवा
तो नंबर पैसे घेऊन देण्यास सुरुवात केल्याने त्यातून मोठा महसूल मिळू लागला आहे. लाखो रुपये खर्च करून गाडी घेतल्यानंतर त्या गाडीला आपल्याला हवा तोच नंबर घेण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी ग्राहक दाखवत आहेत. या लकी नंबरसाठी ३ हजार ते ४ लाख रुपयांपर्यंत पैसे मोजले जात आहेत.