दिवाळी भेट परीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:27+5:302020-11-26T04:26:27+5:30
------- सृजन कला, साहित्य, समाजाचे प्रतिबिंब असलेल्या सृजनचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. कला विभागातील ''''टाळेबंदी : मानवी स्पर्शाचा ...
-------
सृजन
कला, साहित्य, समाजाचे प्रतिबिंब असलेल्या सृजनचे यंदाचे १४ वे वर्ष आहे.
कला विभागातील ''''टाळेबंदी : मानवी स्पर्शाचा अर्थ'''' तसेच मजुरांचे
स्थलांतर, एक देश एक निवडणूक, कामगार कायदे, भारताचे परराष्ट्रीय धोरण या
विषयावरील लेख वाचनीय झाले आहेत. डॉ. गोपाल गुरु यांच्या दीर्घ मुलाखतीचा
काही अंश छापला आहे. जॉर्जस्टिनी या अश्वेत, निरपराध मुलाला अमेरिकेत
फाशी देण्यात आली होती. त्यावरील लोकनाथ यशवंत यांची आपणाला काय त्याचे,
ही कविता अंगावर काटा आणते. कथा, अनुवादित कथा, ललित बंध, अनुवादित
कविता, लेख यांनी हा अंक सजलेला आहे.
संपादक : विजय जाधव,
पृष्ठे : २४४, मूल्य : २५० रू.
----------------
प्रतिबिंब
सकारात्मक व स्वीकारात्मक विचाराने दिवाळीचा चौथा अंक वाचकांना सादर केला
आहे. प्रज्ञा जांभेकर यांचा सर्वात मोठे आव्हान, प्रतिमांवर आरूढ राजकारण
हा डॉ. जयदेव डोळे, पत्रकार संदीप चव्हाण यांचा डोंगरीचा छोरा, ज्येष्ठ
पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचा ठाकरे आणि इतर माणसे, माहिती संचालक हेमराज
बागुल यांचा ''''जगण्यासाठी बदलावे लागेल'''' तसेच पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ.
रवींद्र शिसवे यांचा ''''भरोसा करके को देखो'''' हे लेख वाचकांना नक्कीच
आवडतील.
संपादक : प्रज्ञा जांभेकर,
पृष्ठे : १८४, मूल्य : २०० रू.
-------------------------------------------------
मराठी विज्ञान परिषद पत्रिका
कोरोना लशीच्या निमित्ताने भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन
विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे यांची एकूणच लसीबाबतचे विविध कंगोरे
टिपणारी मुलाखत घेण्यात आली आहे. आजपर्यंतच्या लशींचा आढावाही घेतला आहे.
विज्ञानकथा सदरात ज्ञानेश्वर गटकर, स्वरा मोकाशी, विनय खडांगळे व स्वाती
लोंढे यांच्या कथा आहेत. प्रवास मानवी उक्रांतीचा, कहाणी मुंबई मेट्रोची
आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे निश्चितच वेगळे आणि ज्ञानात भर घालणारे लेख
आहेत. विज्ञानाची रंजक माहिती देणारा हा अंक आहे.
कार्यकारी संपादक : शशिकांत धारणे,
पृष्ठे : १३६, मूल्य : १५० रू.