अबब.... ऐन दिवाळीत म्हाडाची 4253 घरांची सोडत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 07:33 PM2021-10-27T19:33:50+5:302021-10-27T19:36:15+5:30

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे

diwali mhada 4 thousand 253 houses pune soalpur sangli satara | अबब.... ऐन दिवाळीत म्हाडाची 4253 घरांची सोडत

अबब.... ऐन दिवाळीत म्हाडाची 4253 घरांची सोडत

Next
ठळक मुद्देऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 4 हजार 253 घरांची सोडतइतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत

पुणे : गरीब व सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी पुणेम्हाडाने पुढाकार घेत ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 4 हजार 253 घरांची सोडत जाहीर केली आहे. याशिवाय तब्बल 935 लोकांना आपली दिवळी नवीन व हक्काच्या घरामध्ये करता यावी यासाठी येत्या शुक्रवारी नवीन घरांची सोडत व चावी वाटपाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी वाघिरे म्हाडा काॅलनी येथे होणार असल्याची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी म्हाडाचे इस्टेट मॅनेजर विजय ठाकूर उपस्थित होते.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोना काळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लाॅटरीला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर म्हाडाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. त्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा तब्बल 4 हजार 253 घरांची सोडत काढत नवा इतिहास निर्माण केला आहे. यामध्ये  तब्बल 2 हजार 945 सदनिका शहरातील खाजगी आणि नामांकित बिल्डरांच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये आहेत. 

अशी असेल घरांची सोडत 
म्हाडा गृहनिर्माण योजना : 59 सदनिका 
खाजगी बिल्डर 20 टक्क्यांतील घरे : 2945
म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य  : 2886 

सोडतीचे वेळापत्रक 
ऑनलाईन अर्ज दाखल करणे : 29 ऑक्टोबर 
ऑनलाईन अर्ज दाखल करणे अंतिम तारीख  : 29 नोव्हेंबर 
ऑनलाईन पेमेंट स्वीकृती  : 1 डिसेंबर 
ऑनलाईन लाॅटरी : 16 डिसेंबर 

जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करून लाभ घ्यावा 
शासनाने केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करत सर्व मोठ्या बिल्डरांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणा-या दरामध्ये उपलब्ध करून देणे हाच म्हाडाचा मुख्य उद्देश आहे. आता म्हाडाने साडेचार हजार घरांची सोडत काढली असून,  जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.
-  नितीन माने-पाटील, मुख्य अधिकारी, पुणे विभाग म्हाडा

Web Title: diwali mhada 4 thousand 253 houses pune soalpur sangli satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.