मुळशीच्या सुवर्णकन्येची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:17+5:302020-11-22T09:37:17+5:30
मूलखेड येथील कातकरी वस्तीत जाऊन तेथील १४ आदिवासी कुटूंबाना दिवाळी फराळ व कपडे भेट दिली. मुळची चांदे येथील ...
मूलखेड येथील कातकरी वस्तीत जाऊन तेथील १४ आदिवासी कुटूंबाना दिवाळी फराळ व कपडे भेट दिली.
मुळची चांदे येथील रहिवासी असलेली वैष्णवी बाल वयापासूनच कराटे व बॉक्सिंगची आवड असल्याने ती त्यात करिअर करीत आहे. बालवयातच तिने राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत आपले नैपुण्य दाखवून गगनभरारी घेतली आहे. कराटे मातोल व बॉक्सिंग खेळात तिने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले असून अनेक पदकांची कमाई केली आहे. वैष्णविने मागील दोन वर्षांपूर्वीच जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेत काही मिनिटात हजार किलो फरश्या अंगावर फोडून नवा जागतिक विक्रम केला होता. त्यावेळी एक उत्तम कराटेपटू म्हणून तिची लिमका बुकने नोंद घेतली आहे. ती सद्या पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना पुणे विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे.