गणपतीत 'डीजे'चा आवाज राहणार बंद ; पुणे पाेलिसांची मंडळांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 08:05 PM2019-08-22T20:05:49+5:302019-08-22T20:11:22+5:30

गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे लावण्यास पुणे पाेलिसांनी बंदी घातली आहे. याबाबच्या सुचना मंडळांना आज घेतलेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

dj can not be operated in ganesh uthchav ; decision of pune police | गणपतीत 'डीजे'चा आवाज राहणार बंद ; पुणे पाेलिसांची मंडळांना सूचना

गणपतीत 'डीजे'चा आवाज राहणार बंद ; पुणे पाेलिसांची मंडळांना सूचना

Next

पुणे : गणेशोत्सवात कानठळ्या बसविणा-या डॉल्बी डीजेचा वापर मंडळांना करता येणार नाही. उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या सुचना आणि ध्वनि प्रदुषण अधिनियमनुसार मंड्ळांना डॉल्बीविषयी निर्देशित करण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी गणेश मंडळाचे अधिकारी, कार्यकर्ते, साऊंड सिस्टीम चालक व मालक यांना डॉल्बी डीजेचा उपयोग मिरवणूकी दरम्यान करता येणार नसल्याच्या सुचना दिल्या आहेत. 

गुरुवारी पुणे पोलिसांकडूनगणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर करण्यात आली. गणेश प्रतिष्ठापना व गणेश विसर्जन मिरवणूक यात मंडळांकडून साऊंड सिस्टीमचा लावण्याची शक्यता नाकारता येत  नाही. अशावेळी मंडळे, मंडळांचे पदाधिकारी न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार नियमाचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. अनेकदा साऊंड सिस्टीम लावण्यावरुन मंडळे, पदाधिकारी, राजकीय नेते आणि पोलीस प्रशासन यांच्यात वाद झाले आहेत. उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू याकरिता प्रशासनाकडून काळजी घेण्यात येणार असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने वाजविण्यात येणारे साऊंड सिस्टीममधील स्पिकरच्या आवाजाची मर्यादा उच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार ठेवण्यात यावी. प्रत्येक मंडळाने म्युझिक सिस्टिम (स्पिकर) / साऊंड सिस्टीम करिता पोलीस स्टेशनकडून त्याबाबतचा स्वतंत्र परवाना घेणे आवश्यक आहे. मिरवणूकीमध्ये कुठल्याही मंडळाला डीजे किंवा डॉल्बीचा वापर करता येणार नाही. 

मंडळांमध्ये मिरवणूक व  इतरवेळी वाजविण्यात येणारे म्युझिक सिस्टिम / साऊंड सिस्टीम मधील मिक्सर संचलन करणा-या व्यक्तीने स्थानिक पोलीस स्टेशनला आपली संपूर्ण माहिती देऊन प्रशासनाकडून ओळखपत्र घेणे बंधनकारक असणार आहे. 2 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते 13 सप्टेंबर पर्यंत रात्री दहा पर्यंत हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. 

* ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा खालीलप्रमाणे (डेसिबल) 
विभाग          दिवसा          रात्री 
औद्योगिक      75              70
कॉमर्स झोन     65            55
राहण्याची जागा 55          45
शांतता विभाग   50         40 

Web Title: dj can not be operated in ganesh uthchav ; decision of pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.