डीएसके यांच्या जामिनाकडे लक्ष, उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 05:56 AM2017-11-17T05:56:03+5:302017-11-17T05:56:06+5:30

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे़

 DKK's bail will be heard today, hearing in High Court will be heard today | डीएसके यांच्या जामिनाकडे लक्ष, उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

डीएसके यांच्या जामिनाकडे लक्ष, उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

Next

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे़ त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार असूनस गुंतवणूकदार व फ्लॅटधारक यांचे न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे़
गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जे़ टी़ उत्पात यांनी गेल्या बुधवारी डीएसके यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता़ त्यानंतर बचाव पक्षाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्यासाठी आरोपींना सरंक्षण द्यावे, असा विनंती अर्ज केला़ हा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे़ डीएसके ग्रुपच्या शेकडो ठेवीदारांना मुदत संपल्यानंतरही त्यांचे पैसे परत मिळाले नसून असंख्य ठेवीदार तक्रार देण्यास पुढे येत आहेत़ त्यामुळे या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तपास अधिकाºयांना योग्य तपास करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले होते़ या निर्णयाविरोधात डी. एस. कुलकर्णी यांनी गेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ त्यावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचा आदेश देऊन त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता़
‘आमची पैसे परत करण्याची तयारी आहे़ आमची सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याने सध्या आम्ही कोणत्या गुंवणूकदाराचे किती पैसे देणे लागतो, याची माहिती नाही़ त्यामुळे त्यांचे पैसे परत करण्यासाठी आम्हाला जप्त कागदपत्रांची प्रत मिळावी,’ असा अर्ज त्यांनी न्यायालयात केला होता़ ज्यांना फ्लॅटचा ताबा मिळाला नाही, असे असंख्य फ्लॅटधारकही त्रस्त झाले असून ते बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जमले होते़ त्यामुळे उच्च न्यायालयात कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काय निर्णय होतो, याकडे गुंतवणूकदार व फ्लॅटधारकांचे लक्ष लागले आहे़
उच्च न्यायालयात सरकारची बाजू ठामपणे मांडण्यासाठी या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर हे दोन दिवसांपासून मुंबईत असून या जामीनअर्जाला विरोधासाठी सरकारी वकिलांबरोबर चर्चा करीत आहेत़ दुसरीकडे, ‘माझ्याविरुद्ध तक्रार केली आता मी तुमचे का पैसे देऊ?’ अशी भूमिका डीएसकेंनी घेतली आहे़
मुख्यमंत्र्यांना निवेदन : स्वतंत्र एसआयटी स्थापन करा
डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विविध कंपन्यांमध्ये मुदत ठेवी ठेवणाºया गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे़ त्यात त्यांनी डीएसके प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली़
याबाबत वृषाली कुलकर्णी यांनी सांगितले, की डीएसके यांच्याकडून फसविल्या गेलेल्या गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन एक निवेदन तयार केले आहे़ त्यावर पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर येथील ७५० गुंतवणूकदारांनी सह्या केल्या आहेत़ स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी वेळही मागण्यात आली आहे़

Web Title:  DKK's bail will be heard today, hearing in High Court will be heard today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.