पीएमपी आगारामध्ये डिझेल घोटाळा?

By Admin | Published: April 9, 2017 04:44 AM2017-04-09T04:44:36+5:302017-04-09T04:44:36+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) हडपसर आगारामध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडून डिझेलचा एक टँकर सील करण्यात आला. या टँकरमध्ये सुमारे ७८६ लिटर

DMP scam in PMA Agra? | पीएमपी आगारामध्ये डिझेल घोटाळा?

पीएमपी आगारामध्ये डिझेल घोटाळा?

googlenewsNext

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) हडपसर आगारामध्ये वैधमापन शास्त्र विभागाकडून डिझेलचा एक टँकर सील करण्यात आला. या टँकरमध्ये सुमारे ७८६ लिटर डिझेल कमी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार आधीपासून सुरू असल्याची चर्चा असून डिझेलमध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘पीएमपी’कडून दीड-दोन वर्षांपूर्वीपासून एका खासगी कंपनीकडून बससाठी डिझेलची खरेदी केली जात आहे. सर्व आगारांना याच कंपनीकडून डिझेलचा पुरवठा केला जातो. या कंपनीकडून टँकरद्वारे पीएमपीला डिझेल पुरविले जात आहे. शुक्रवारी हडपसर आगारामध्ये एक टँकर डिझेल घेऊन आल्यानंतर तेथील ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांना डिझेल कमी असल्याची शंका आली. त्यांनी मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. तसेच वैधमापनशास्त्र विभागाशीही संपर्क साधण्यात आला.
वैधमापनच्या अधिकाऱ्यांनी डिझेलची मोजणी केली असता बारा हजार लिटरच्या या टँकरमध्ये ७८६.९४ लिटर डिझेल कमी आढळून आले. त्यामुळे हा टँकर पंचनामा करून सील करण्यात आला आहे.
टँकरच्या आतमध्ये काही बदल करण्यात आला आहे का, याचाही पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून कंपनी व टँकर चालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

खरेदी-वापराची माहिती संकलित करणार
टँकरमधून पीएमपीला यापूर्वीही कमी डिझेल मिळाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डिझेलमध्ये घोटाळा असल्याची चर्चा सुरू झाली असून, याबाबत आता पीएमपी प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. आतापर्यंत झालेली डिझेल खरेदी व वापर याची सर्व माहिती संकलित केली जाणार असल्याचे समजते.

Web Title: DMP scam in PMA Agra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.