ज्ञानेश्वर विद्यालयाने राखली निकालाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:24+5:302021-07-19T04:08:24+5:30
विद्यालयातून प्रथम क्रमांक ऋतुजा रमेश काचगुंडे ९८.६० टक्के, द्वितीय क्रमांक योगेश विश्वास सावंत व तनया प्रमोद दिवटे ९४.६० ...
विद्यालयातून प्रथम क्रमांक ऋतुजा रमेश काचगुंडे ९८.६० टक्के, द्वितीय क्रमांक योगेश विश्वास सावंत व तनया प्रमोद दिवटे ९४.६० टक्के तर तृतीय क्रमांक ज्ञानेश्वरी गणेश तौर ९४.४० टक्के गुण प्राप्त करून मिळवला. त्याचप्रमाणे विद्यालयातील दिव्यांग (अंध) युनिटचा निकाल परंपरागत याही वर्षी शंभर टक्के लागला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, पांडुरंग कुऱ्हाडे, पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, समिती प्रमुख नारायण पिंगळे, समन्वयक अनुज्यायिनी राजहंस, मुख्याध्यापक दीपक मुंगसे आदींसह गुणवत्ता विभाग, उपक्रमशील गुणवत्तावाढ समितीने अभिनंदन केले. दरम्यान प्रातिनिधिक स्वरूपात यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.