उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी हे करा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:31 PM2019-04-27T16:31:38+5:302019-04-27T16:34:00+5:30
वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास हाेण्याची शक्यता असते. त्यावर आता पुणे दिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उष्माघातापासून संरक्षण मिळावे यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे.
पुणे : राज्यात सुर्य सर्वत्रच आग ओकत आहे. मराठवाड्यात पाऱ्याने 45 शी गाठली आहे. पुण्यातही पारा 42 अंशावर जाऊन पाेहचला आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. अशातच वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास हाेण्याची शक्यता असते. त्यावर आता पुणे दिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत उष्माघातापासून संरक्षण मिळावे यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे.
उष्माघातापासून स्वतःला वाचविण्यासाठी खालील गाेष्टी करा
- तहान नसल्यास देखील पुरेसे पाणी प्या.
- साैम्य रंगाचे, सैल, आणि काॅटनचे कपडे वापरा.
- बाहेर जाताना गाॅगल्स, छत्री, टाेपी, बूट, किंवा चप्पल वापरा
- प्रवास करताना साेबत पाणी घ्या
- आपले घर थंड ठेवा,पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
- उन्हात डाेक्यावर छत्री, टाेपीचा वापर करा, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
- अशक्तपणा, कमजाेरी असेल तर त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्या
- ओआरएस, घरची लस्सी, ताेरणी, लिंबु पाणी, ताक इत्यादी घ्या.
- जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या
- फॅनचा वापर करा, थंड पाण्याने आंघाेळ करा.
उन्हाळ्यात हे करु नका
- दुपारी 12 ते 3 उन्हात फिरु नका
- मद्यसेवन, चहा, काॅफी आणि कार्बाेनेटेड साॅफ्ट ड्रींक्स घेऊ नका, त्यामुळे डीहाइड्रेट हाेते.
- उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
- पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना साेडु नका.
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हेल्पलाईन देखील देण्यात आली आहे. 1077 /02026123371