मुलांसाठी सत्कृत्य करा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:39+5:302021-04-22T04:11:39+5:30
पुणे : मुलांमध्ये दयाभाव व सत्कृत्य करण्याची भावना जागृत करण्याकरिता जैन सोशल ग्रुप यूथ पुणे सेंट्रलच्या वतीने परिवर्तन-द अॅक्ट ...
पुणे : मुलांमध्ये दयाभाव व सत्कृत्य करण्याची भावना जागृत करण्याकरिता जैन सोशल ग्रुप यूथ पुणे सेंट्रलच्या वतीने परिवर्तन-द अॅक्ट ऑफ काईंडनेस या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ग्रुपचे अध्यक्ष प्रीतम भटेवरा यांनी ही माहिती दिली. पवन भंडारी, धीरज ओस्तवाल, आनंद चोरडिया यावेळी उपस्थित होते. स्पर्धा ४८ दिवसांची आहे. वयवर्षे ७ ते ९, ९ ते १२ आणि १२ ते १५ या तीन वयोगटांत होईल. प्रत्येक स्पर्धकाने दिवसातून एकदा एक चांगले काम म्हणजेच सत्कृत्य करायचे आहे. त्याची नोंद दिलेल्या वहीत स्वहस्ताक्षरात करायची. ते ऑनलाईन अपलोड करायचे. दिनांक २४ एप्रिल २०२१ पर्यंत स्पर्धकांना www.jsgypc.org यावर नोंदणी करता येईल. १ मे ते १८ जून हा स्पर्धेचा कालावधी आहे. पारितोषिक वितरण २७ जूनला होईल. सर्व कार्यक्रम व स्पर्धा ऑनलाईन होणार आहे.