अर्थव्यवस्था प्रगतिपथावर नेण्यासाठी ‘हे’ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:09+5:302021-09-03T04:10:09+5:30
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी) आणि पुणे ‘आयसीएआय’ ...
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी) आणि पुणे ‘आयसीएआय’ यांच्या वतीने आयोजित ‘सीएफओ-सीईओ’ संवाद सत्रात टिळक बोलत होते. या वेळी ‘आयसीएआय’ केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘सीएमआयबी’चे चेअरमन सीए हंस राज चुग, सीए दुर्गेश काबरा, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, पुणे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष व खजिनदार समीर लड्डा, माजी अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए ऋता चितळे आदी उपस्थित होते.
टिळक म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा तुलनेने फारसा परिणाम झालेला नाही. भारताची लोकसंख्या आणि भौगोलिक आकार यामुळे सेवा व उत्पादन क्षेत्रात मोठी उपलब्धी आहे. याचा वापर जागतिक बाजारपेठेत झाला, त्याची निर्यात वाढवली, तर भारताला त्याचा फायदा होईल. कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना रुजली आहे. अर्थव्यवस्थेत बदल आणणारा हा घटक आहे. गेल्या काही महिन्यांत वेतनातील अनिश्चिततेमुळे गुंतवणुकीकडे त्यातही विशेषत: शेअर बाजाराकडे अनेक लोक वळले आहेत. दीड वर्षात एक कोटीपेक्षा जास्त डीमॅट खाते उघडले गेले असून, व्यवहारही होत आहेत. येणाऱ्या काळात आर्थिक, कामगार, शैक्षणिक धोरणे आखताना या घटकांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यात सनदी लेखापालांनी महत्वाची भूमिका बजावावी. सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सायली चंदेलिया यांनी सूत्रसंचालन केले.