‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

By राजू हिंगे | Published: August 13, 2023 04:39 PM2023-08-13T16:39:27+5:302023-08-13T16:39:53+5:30

भाजपला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Do not believe in uncle nephew Due to the notice of ED the meeting between the two, Prakash Ambedkar's secret burst | ‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

‘काका-पुतण्या’वर विश्वास नाही! ‘इडी’च्या नोटीशीमुळे दोघांची बैठक, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

googlenewsNext

पुणे : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात झालेली बैठक ही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे नातेवाईक भगवंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीस बाबत होती . त्या बैठकीत पुढे काय झाले त्याबाबत माहित नाही ,असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जो काही चुकीचा इतिहास घडला असतो तो विसरून नव्याने घडवायचा असतो .या इतिहासाची पूनारवृत्ती होती आहे. हे भयानक आहे. भाजपला देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? असा सवाल उपस्थित करून ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्मावर आधारित फाळणी भाजपला करायची आहे आरएसएसचा इतिहास कधीच बदलणार नाही. तिरंगा हा सगळ्यांच्या घरात फडकतो. त्यामुळे हर घर तिरंगा पेक्षा हा आरएसएसच्या लोकांच्या घरात फिरवला पाहिजे, असेही आंबेडकर यांनी सांगितले. नवाब मलिक यांना नुकतंच जामीन मंजूर झाला आहे. मलिक यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे. कोर्टाने सांगितलं आहे की त्या बेसेसवरच जमीन दिला आहे. त्यात शंका घेण्यासारख काही नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

माझा कोणावरही विश्वास नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पैकी कोणावर तुमचा अधिक विश्वास आहे या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले ,माझा कोणावर विश्वास नाही.

Web Title: Do not believe in uncle nephew Due to the notice of ED the meeting between the two, Prakash Ambedkar's secret burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.