सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका : सुवेझ हक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 09:13 PM2018-07-03T21:13:13+5:302018-07-03T21:20:30+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा अफवांमुळे काही जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत.

Do not believe in rumors on social media: Suvez Haq | सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका : सुवेझ हक

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नका : सुवेझ हक

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांचे लक्ष असून अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई

पुणे: मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत, मात्र, अशा अफवांवर जिल्हयातील जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी केले आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा अफवांमुळे काही जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच कोणी अशा प्रकारची अफवा पसरवत असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवा. खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर असला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नका. अफवा पसरविणा-या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष असून अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सुवेज हक यांनी दिला .
अफवा फसरविणा-या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी पुणे ग्रामीण मुख्य नियंत्रण कक्षास दूरध्वनी क्रमांक २५६५ ११२७, २५६५७१७१,२६६५७१७२,१०० तसेच हेल्पलाईन क्रमांक १०९१ या नंबरवर अथवा नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहनही हक यांनी केले.

Web Title: Do not believe in rumors on social media: Suvez Haq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.