डिझेल बस खरेदी करू नका, मुख्यमंत्र्यांचे पीएमपीला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:34 AM2018-06-28T03:34:31+5:302018-06-28T03:34:33+5:30
शहरांच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीने आगामी काळात एकाही डिझेल बसेसची खरेदी करू नये.
पुणे : शहरांच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीने आगामी काळात एकाही डिझेल बसेसची खरेदी करू नये. तसेच भाडेतत्त्वावरदेखील बसेस घेऊ नये, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसचे सीएनजीवरील ४०० व इलेक्ट्रिकवरील ५०० बस खरेदीची प्रक्रिया लवकर राबवा, असे आदेशदेखील त्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी नुकतेच पुण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, पीएमपीचे संचालक, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, आयुक्त सौरभ
राव यांच्याशी त्यांनी पीएमपी बसखरेदीसह विविध प्रश्नांवर
चर्चा केली. यामध्ये शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढत आहे.
यामुळे यापुढे पीएमपीने एकाही डिझेल बसची खरेदी
करू नये. भाडेतत्त्वावरही डिझेल बस घेऊ नये.
पीएमपीने सीएनजीवरील ४०० आणि इलेक्ट्रिकवरील (बॅटरी आॅपरेटेड) ५०० बस खरेदीची प्रक्रिया लवकर राबवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार सीएनजी आणि इलेक्ट्रिकवरील ५०० बसची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार असल्याची माहिती सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. याशिवाय आगामी निवडणुकीच्यादृष्टीने इलेक्ट्रिक बसेसची खरेदी, वेस्ट एनर्जी आणि एचसीएमटीआर रस्ता या तीन प्रकल्पाकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचनादेखील मुख्यंत्र्यांनी केल्या.