रुग्णवाहिकांचे निश्चित दराप्रमाणे शुल्क आकारावे, अन्यथा कारवाई; आरटीओकडून इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 11:47 AM2020-09-19T11:47:26+5:302020-09-19T11:49:05+5:30

आतापर्यंत तीन रुग्णावाहिकांवर कारवाई

Do not charge extra for ambulances; Warning from RTO | रुग्णवाहिकांचे निश्चित दराप्रमाणे शुल्क आकारावे, अन्यथा कारवाई; आरटीओकडून इशारा 

रुग्णवाहिकांचे निश्चित दराप्रमाणे शुल्क आकारावे, अन्यथा कारवाई; आरटीओकडून इशारा 

Next
ठळक मुद्देकोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर आरटीओकडून रुग्णावाहिकांचे दर निश्चित

पुणे : काही रुग्णवाहिका मालकांकडून निश्चित दरापेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे शुल्क आकारावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, रुग्णांची वाहतुक निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त दराने केल्याप्रकरणी कार्यालयाने आतापर्यंत तीन रुग्णवाहिकांवर कारवाई केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून रुग्णावाहिकांचे दर निश्तित करण्यात आले. या दरापेक्षा जास्त दराने रुग्ण वाहतुक केल्यास कारवाईचा इशारा आरटीओकडून देण्यात आला होता. याअंतर्गत जुलै महिन्यात पहिल्या कारवाईमध्ये एका रुग्णवाहिकेच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यानंतरही काही रुग्णावाहिकांकडून जादा दर घेण्याच्या तक्रारी येत आहेत. एमएच १२ डीटी ३१५८ आणि एमएच १४ सीडब्ल्यु ०५१३ या दोन रुग्णवाहिका मालकांकडून जास्त भाडे घेतल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी आदेश दिल्यानंतर आरटीओच्या वायुवेग पथकाकडून गुरूवारी दोन्ही रुग्णवाहिका ताब्यात घेण्यात आल्या असून मोटार वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णांना रुग्णालयात वेळेत पोहचता येत नसल्याच्या अनेक घटना घडत आहेत. तर दुसरी काही रुग्णवाहिका चालक रुग्णांची अडवणुक करून त्यांच्याकडून जादा भाडे घेत आहेत. रुग्णवाहिकांचे दर प्रकार व वापरानुसार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसारच नागरिकांना रुग्णवाहिकांना पैसे द्यावेत. रुग्णवाहिका मालकांनी जादा दर घेऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
-----------
रुग्णवाहिकांचे दर (रुपयांत)
रुग्णवाहिका प्रकार २५ किमी /२ तास प्रती किमी प्रति प्रतिक्षा तास
मारूती ५०० ११ १००
टाटा सुमो, मॅटेडोर या
कंपनीने बांधणी केलेली ६०० १२ १२५
टाटा ४०७, स्वराज माझदा या
चॅसीजवर बांधणी केलेली ९०० १३ १५०
------------------------

Web Title: Do not charge extra for ambulances; Warning from RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.