ना मानले त्यांचे फसवे करार काही; डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत 'लोकमत' कार्यालयात रंगला मराठी गझल मुशायरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:11 PM2024-12-02T12:11:29+5:302024-12-02T12:13:38+5:30

तरुण-तरुणींच्या विचारातून अशा एकापेक्षा एक गझल पेश होत गेल्या आणि 'लोकमत'च्या कार्यालयातील मुशायरा फुलत गेला.

Do not consider their fraudulent contracts Marathi Ghazal Mushaira was held at Lokmat office in the presence of Dr. Vijay Darda | ना मानले त्यांचे फसवे करार काही; डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत 'लोकमत' कार्यालयात रंगला मराठी गझल मुशायरा

ना मानले त्यांचे फसवे करार काही; डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत 'लोकमत' कार्यालयात रंगला मराठी गझल मुशायरा

पुणे : कधीचे मृगजळामागे पळत होतो जरी आपण, खरा तितकाच होता ना पायातला काटा. आता एकत्र वाहिलो तर प्रलय होईल हा, बरे होईल हे की चल करूया वेगळ्या वाटा...

तरुण-तरुणींच्या विचारातून अशा एकापेक्षा एक गझल पेश होत गेल्या आणि 'लोकमत'च्या कार्यालयातील मुशायरा फुलत गेला. 'लोकमत बुक क्लब'तर्फे आयोजित या मैफिलीच्या अध्यक्षस्थानी होते खुद्द लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, या मैफिलीत सुरेश वैराळकर, पुण्याच्या अमृता जोशी, नांदेडचे सारंग पांपटवार, रत्नागिरीच्या सांची कांबळे, अकोल्याचे अमित वाघ यांनी सहभाग घेत मैफलित रंगत आणली. किंवा फसव वा फायदा घे तू कसाही, जिवना अधिकार सगळे मी तुझ्या हवाली केले. ही अवस्था कोणती आहे मलाही कळेना, घाव जितका खोल जातो, तेवढी येते उभारी... या शायरीतून त्यांनी शायरीचे खास वैशिष्ट्य असणाऱ्या 'वेदनेला' जणू फुंकर घातली.

'अद्याप काळजाशी जपलेत वार काही, शत्रूत मोजते मी माझेच यार काही... ...चर्चा हजार झाल्या नमले कधीच नाही, मी मानले त्यांचे फसवे करार काही... आदी ना शायरीने मुशाफिरी सुरू केली. नांदेडचे सारंग पांपटवार यांनी श्रृंगारातील शेरने सुरुवात करताना म्हटले की, 'परिस्थिती माझीही दुर्धर होती, पण इच्छाशक्तीही जब्बर होती, आतासुद्धा घमघमतो आहे मी, जी कोणी होती ती अत्तर होती... एकेकाळी मीही अमीर होतो.. माझीसुद्धा लफडी सत्तर होती... हा वैराळकर यांनी निवेदन करताना तरुणांच्या गझल या थेट सुरेश भट यांच्या गझलेशी साधर्म्य कशा साधतात हे सांगतानाच प्रत्येक गझलेनंतर एक एक शेर पेश करत राहिले आणि मैफिलीत भटांच्या गझलेची दरवळ वाढत गेली. गरवारे महाविद्यालयातील प्रा. अमृता जोशी यांच्या गझलेने मैफलीला सुरुवात झाली.

प्रेम कर  शेर सादर झाला अन् मैफिलीचे वातावरणही अत्तरासारखे सुगंधित झाले. त्या पाठोपाठ त्यांनी शेर ठेवला... उरले नाही कोणालाच रंगाचे कौतुक, जिकडे तिकडे चालले सरड्यांचे कौतुक. बघायला गर्दीला गर्दी जमली आहे, उरले आहे टाळ्यांना टाळ्याचे कौतुक. या गझलेने वास्तवावर चाबूक ओढले गेले. काय कामाचा फणा माझा, वाकलेला जर कणा माझा. घेतले आधी विवेकाने, बघ आता वेडेपणा माझा. वाचली जेव्हा बहीण आम्ही, माज जिरला शिक्षणा माझा.. हा शेर अकोल्याचे गझलकार अमित वाघ यांनी सादर केला. 'दूर माणसे करते सडकी, फार चांगली असते कडकी, हवी तेवढी लाव आग तू शीतल बनते तितकी मडकी. एक दिवस ठरलेला असतो, असे इमारत म्हणते पडकी. फुरसत मध्ये बनली दुनिया, मीच एकटा तडका-फडकी'... अशी गजल सादर केली.

रत्नागिरीच्या सांची कांबळे यांनी मैफलीत गझल ठेवताना म्हटले की, जगावा लागतो शब्दातला अवकाशही येथे, विनासायास येते का छटा चिमटीत एखादी. पेशाने तलाठी असणाऱ्या सांची यांनी सरकारी शब्द गझलेत कसा येतो याचे उदाहरण देत म्हटले की, भले सातबारा रिकामा उरो, मला नोंद कुठली दुमाला नको. कथा चार घटकेतली आपली, पुन्हा त्यातही दुरावा नको... या प्रसंगी 'लोकमत'चे समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक संजय आवटे, सहायक उपाध्यक्ष निनाद देसाई, जाहिरात महाव्यवस्थापक अलोक श्रीवास्तव, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे वरिष्ठ महाव्यवस्थापक पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सुरेश भट यांच्या आठवणीने विजय दर्डा गहिवरले
गझलकार सुरेश भट यांची गझल ऐकली की मला माझ्या पत्नीची आठवण येते; कारण भट यांचे दर्डा परिवाराशी अगदी जिव्हाळ्याचे नाते होते. माझी पत्नी ज्योत्स्ना हिने सुरू केलेल्या एका सांस्कृतिक मंचच्या उद्घाटनासाठी ते माझ्या घरी आले होते. तेव्हा एकच धमाल झाली होती, ही आठवण सांगताना लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा भावविवश झाले. मुंबईमध्ये ताज हॉटेलमधील जेवण आणि त्यानंतर सीएम साहेबांशी त्यांच्या दालनात झालेली भेट, त्यावेळी असलेले सुरेश भट साहेबांचे बिनधास्त, बेधडक वागणे यांचे किस्सेही दर्डा यांनी सांगितले. असा अवलीया मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही, असेही ते म्हणाले. 

Web Title: Do not consider their fraudulent contracts Marathi Ghazal Mushaira was held at Lokmat office in the presence of Dr. Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.