मुलगा-मुलगी भेद नको - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 03:14 AM2017-10-16T03:14:44+5:302017-10-16T03:14:58+5:30

‘‘मुलगी नको, मुलगाच हवा. मुलगी झाली तर वाईट घडेल, या गोष्टींचा विचार न करता मुलींच्या बाबतीत समाजप्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून मुलगा - मुलगी असा भेद अजिबात करू नये,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

 Do not discriminate between girl and girl - Girish Bapat | मुलगा-मुलगी भेद नको - गिरीश बापट

मुलगा-मुलगी भेद नको - गिरीश बापट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘‘मुलगी नको, मुलगाच हवा. मुलगी झाली तर वाईट घडेल, या गोष्टींचा विचार न करता मुलींच्या बाबतीत समाजप्रबोधन करण्याच्या दृष्टिकोनातून मुलगा - मुलगी असा भेद अजिबात करू नये,’’ असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
पत्रकार भवन येथे ऋणानुबंध या दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार शरद रणपिसे, डॉ़ नीलम गोºहे, पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, माजी आमदार मोहन जोशी, जिल्हा समिती अध्यक्ष रोहित पवार, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, वर्षा हुंजे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘आज आपण समानतेच्या गप्पा मारतो. महिलांच्या विषयावर समाजात जनजागृती होणे महत्वाचे आहे. पालकांना मुली जन्माला आल्याचा अभिमान हवा.’’
नीलम गोºहे म्हणाल्या, ‘‘दक्षिण आशियात अनेक मुली दृष्टिहीन होत आहेत. गेल्या १५ वर्षात हे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम हाती घेतली आहे. मुली स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहत आहे. पण मुलींवर होणारे अत्याचार किंवा असुरक्षितता याला माध्यमांनी जगासमोर आणून सकारात्मक भूमिका दाखवली आहे.’’
विश्वास नांगरे पाटील म्हणाले, ‘‘मी मुलीवर लेख लिहिण्याचा प्रयत्न केले पण माझ्या स्वत:च्या मुलीकडे पाहून काय लिहावे हे मला कळाले नाही.’’ सलील कुलकर्णी म्हणाले, आपण जवळच्या व्यक्तीविषयी कधी बोलत नाही. पण हा अंक पाहून मुलींना योग्य मार्ग मिळेल असे मला वाटते.’’ वर्षा हुंजे यांनी प्रास्ताविक व मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
मुली पोलीस स्टेशनला जाण्यास घाबरत असतात म्हणून आम्ही पश्चिम महाराष्ट्रात निर्भया पथके चालू केली आहेत.
- विश्वास नांगरे पाटील

Web Title:  Do not discriminate between girl and girl - Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.